कट्यार
☀ ☀ ☀
कट्यार हे मराठा पध्दतीचे शस्त्र आहे. हे छत्रपती शिवाजी महाराजांचे आवडते शस्त्र होते. त्यांच्या कमरेला शेल्यामध्ये कट्यार नेहमीच असायची. छत्रपती शिवाजी महाराजांचा असा दंडक होता की, प्रत्येक सैनिकाजवळ तलवार, ढाल या प्रमुख शस्त्रांबरोबर एक छोटे शस्त्र असले पाहिजे, जसे शेल्यामधील कट्यार, अथवा अस्तनीमध्ये बिचवा... युध्दात वेळप्रसंगी हे शस्त्र वापरता येत असे..
कट्यार हे छोट्या शस्त्रांपैकीसर्वात प्रभावी शस्त्र आहे; त्यामुळे त्याला भारतभर प्रसिध्दी मिळाली व वेगवेगळ्या राज्यकर्त्यांनी आपल्या कारागिराकडून कट्यारी बनवून घेतल्या. त्या कट्यारींवर त्या-त्या प्रदेशांची छाप पडली व कट्यारीचे अनेक प्रकार तयार झाले. राजा, राणी व दरबारातील मान्यवर सतत आपल्याबरोबर कट्यार बाळगत असत. कट्यारीची लांबी १० इंच ते २० इंच च्या दरम्यान असते. कट्यारीचे पाते, नख्या व मूठ हे तीन भाग असतात. हे तीनही भाग अखंड धातूमध्ये ओतून कट्यार बनविली जाते. काही कट्यारींमध्ये हे तीनही भाग रिव्हेटने एकत्र जोडलेले असतात.
कट्यारीचे प्रकार:
१) मराठा कट्यार:- १० ते २० इंच लांबीची अखंड ओतीव असते, तिचा अर्धाभाग पकडण्यासाठी असून हाताचे संरक्षण करण्यासाठी दोनउभ्या पट्ट्या असतात.
२) मुघल कट्यार:- पाते, नख्या, मूठ असे कट्यारीचे तीन भाग रिबेटने जोडलेले असतात पाते बहुतांश:तलवारीचच वापरतात नख्या व मूठ यांच्यावर नक्षीकाम केलेले असते.
३) हैद्राबादी कट्यार:- याचे पाते लांब व रुंद असते ते पातळ पत्र्याचे बनविलेले असते. या कट्यारीत हाताचे संरक्षण करण्यासाठी मूठीवर संरक्षण कवच असते, त्यामुळे मनगटापर्यंत हाताचे संरक्षण होते. हैद्राबादी कट्यारी १५ इंचापासून २५ इंचापर्यंत लांब असतात.
४) मानकरी कट्यार:- शोभिवंत, मजबूत, जाडजूड व सोन्या चांदीचे नक्षीकाम केलेली असते.
५) सैनिकांची कट्यार:- साधी पण मजबूत असते.
६) स्त्रिया व मुले यांची कट्यार:- स्त्रिया व मुलांसाठी लहान आकाराच्या, कमी वजनाच्या शोभिवंत कट्यारी बनवल्या जात.
कट्यारीचे इतर प्रकारही आहेत जसे, जंबीया, खंजीर, खंजराली, पेशकबज इत्यादी...
७) चिलखत भेदी कट्यार -
एक संहारक अस्त्र म्हणुन देखिल कट्यार वापरली जावु शकते ….हा एक कट्यारीचा उत्तम प्रकार असुन या कट्यारीत पात्याच्या टोकाकडील भागाजवळ पात्याची जाडी (रुंदी) जास्त असते ..पाते किंचित फ़ुगलेले असते ..त्यामुळे पात्याला जास्त ताकद मिळते .अशीकट्यार चिलखत देखिल फ़ाडुन आत वार करते ..
यांच्या पात्याच्या टोका जवळील(टिप) भाग वेगवेगळा असतो ..
कधी कधी युद्धा मध्ये तुटलेल्या तलवारींची पाती देखिल वाया न घालावता त्यापासुन देखिल कट्यारी बनवल्या जात होत्या.. तुटलेल्या पात्यांना कट्यारीची मुठ बसवुन हत्यार पुर्ण केले जात असे.. म्हणुनच बरेच दा आपल्याला पात्याची कमी अधिक उंची कट्यारी दिसतात
शिवकालीन इतिहास
Total Pageviews
Thursday, 16 June 2016
कट्यार
शिवकालीन गुडीपाडवा
सदर - शिवकालीन गुडीपाडवा
भाग ३
शेवटचा टप्पा..
शिवरायांच्या काळात पाडवा सण साजरा होत नसता, तर नारायण शेणवीने त्या दिवसाचा उल्लेखच "पाडव्याच्या निमित्ताने निराजीपंत घरी आले" असा केलाच नसता.
रुढी-परंपरा चालीरीती अन सणसुद हे आपल्या संस्कृतीत पिढ्यानुपिढ्या चालत येत असतात.
मागील पिढीकडुन पुढच्या पिढीकडे पाझरत येत असतात.
संस्कारातुन आजी आजोबांकडुन नातवाकडे येत असतात.
शिवकाळात "गुढी- पाडवा" सण साजरा होत होता ह्याचा अतिशय स्पष्ट उल्लेख दुभाषी नारायण शेणवीने आपल्या चैत्र शुध्द अष्टमीला (४ एप्रिल १६७४) ला थेट राजधानी रायगडाहुन लिहिलेल्या पत्रात देतोय.
अशा प्रकारे समाजात दुही माजवणाऱ्या संघटनांना वैचारिक पातळीवर आपण शांत करू शकतो. म्हणून हा लेख प्रपंच !!
शिवकालीन गुडीपाडवा हि सदर संपली.
शिवकालीन गुडीपाडवा
सदर - शिवकालीन गुडीपाडवा
भाग २
हि मंडळी दिनांक ३ एप्रिल १६७४ ला दुपारी रायगडावर पोहचली.
आत्ता मित्रांनो, नारायण शेणवीने ४ एप्रिल १६७४ ला आपल्या इंग्रज कमिटीला मुंबईला लिहिलेल्या पत्रात पुढे काय लिहीतोय ते पहा ते अत्यंत महत्वाचे आहे.
दिनांक २८ मार्च रोजी पाडव्याच्या निमित्ताने निराजीपंत गडावरून पाचाडला आले."
अशाप्रकारे जबरदस्त पुरावा आपल्या हाताला लागला आहे.
निराजीपंत रायगडाहुन पाचाडला इंग्रज वकीलाच्या भेटिस केव्हा आले ?
उत्तर आहे पाडव्याला !
नारायण शेणवी इंग्रजांच्या मुंबई वसाहतीस पत्रात कधी लिहीतोय तर चैत्र शुद्ध अष्टमीला दिनांक ४ एप्रिल १६७४.
महाराष्ट्रीयनवासी नारायण शेणवी हा मनुष्य अनेक भाषांत तरबेज होता. अन मुंबई येथे इंग्रजांसाठी दुभाषी म्हणून कार्यरत होता.
तो स्वता: २९ एप्रिलला पाडव्याच्या निमित्ताने निराजीपंत पाचाडला आपल्या घरी आले". असे लिहितो.
वरील ओळीत महाराष्ट्रीयन सणासुदीस चांगलेच ओळखणारा शेणवी "पाडवा" ह्या सणाचा अगदी स्पष्ट उल्लेख करतो व निराजीपंत आपल्या सहकुटुबांसोबत जो सण साजरा करण्यास घरी आले तो पाडवा "दिवाळी - पाडवा" नव्हता तर चैत्र शुध्द प्रतिपदेचा दिन होता. हिंदू नववर्षाचा हा पहिला दिवस होता.
म्हणूनच निराजीपंत तो हिंदू नववर्षाचा प्रथम दिवस "गुडीपाडवा" आपल्या सहकुटुंबासोबत साजरा करण्यास आपल्या घरी आले होते.
थोड्याच वेळात शेवटचा भाग !
शिवकालीन गुडीपाडवा
शिवकालीन गुडीपाडवा
भाग १
मार्च १६७४ ला मुंबईच्या इंग्रज सल्लागार समितीने एका ठरावामार्फत वकील हेन्री ऑक्झिडेन व दुभाषी नारायण शेणवी यांस राजधानी रायगडावर शिवरायांची भेट घेण्यासाठी पाठवले होते. ते दोघे व त्यांचे इतर दोन सहकारी २४ मार्च १६७४ ला पाचाडला प्रथम प्रल्हाद निराजी आवजी पंडित (अष्टप्रधान मंडळातील प्रमुख न्यायाधीश) ह्यांची भेट घेण्यास आले. मात्र प्रल्हाद निराजीपंत रायगडावर होते. म्हणून नारायण शेणवीने तसा रायगडावर वर्दी धाडली.
रायगडावरून निराजीपंतानी निरोप पाठवला की,
"शिवरायांची एक भार्या म्हणजे महाराणी काशीबाईसाहेब नुकत्याच मरण पावल्याने महाराज सध्या सुतकात आहेत".
म्हणून सुतक फिटेपर्यंत तुम्ही म्हणजे हेन्री ऑक्झिडेन, दुभाषी नारायण शेणवी व इतर दोघे थेट गडावर न येता पाचाडातील माझ्या घरी रहावे. पाचाडात हि सर्व मंडळी २९ मार्च ते २ एप्रिल पर्यंत एका स्वतंत्र खोलीत राहिले. नारायण शेणवी व हेन्रीने पाच दिवस पाचाडात रिकामटेकडेपणात घालवले. अशी नोंद त्याने डायरीत केली आहे.
शिवरायांचे चलन
*शिवरायांचे चलन*
*भाग १*
राज्याभिषेकापूर्वी म्हणजेच १६६४ च्या दरम्यान छत्रपती शिवरायांनी पहिले चलन (नाणे) प्रसिध्द केले या नाण्यावर "जी" व "सी" ही अक्षरे आढळून येतात ह्या नाण्याचे वजन अंदाजे पाऊण तोळा आहे हे स्वराज्याचे पहिले नाणे होते !
१५६५ साली विजयनगरचा सम्राट सदाशिवराय हा बहामनी सत्तेकडून पराभूत झाल्यानंतर १०० वर्षे आपण परकिय चलन आपण वापरत होतो.
छत्रपतींनी हे नाणे अस्तित्वात आणून ही कोंडी फोडली ह्यानंतर महाराजांनी "शिवराई" हे चलन अस्तित्वात आणले जे पेशवाईच्या अस्तापर्यंत म्हणजेच १८६० पर्यंत बाजारात चलन म्हणून वापरली जात होती.
६ जून १६७४ म्हणजेच शिवराजाभिषेक यासमयी छत्रपतींनी "सुवर्णहोन" हे चलन अस्तित्वात आणले शिवरायांच्या मृत्युसमयी स्वराज्याच्या तिजोरीच्या झालेल्या मोजणीवरून सभासद संदर्भ असा की, तिजोरीत सर्व नाणी मिळून ७९ लाखाच्या पुढे होती.
त्यात सुवर्णहोन ४ लाखापेक्षा जास्त होती त्यात इतर सुवर्णनाण्यांचे प्रकार गंबार, मोहरा, पुतळ्या, पातशाही होन, सनगरी, अच्युतराई, देवराई, रामचंद्रराई, गुत्तीहोन, धारवाडी, सतलाम्या, इभ्रराम्या, शिवराई, कावेरी पाक, प्रलयघटी, पाक नाईकी, आदवणी, जडमाल, ताडपत्री, आफरजी, बिलधरी, वेंकेटराई, उलफकरी, देवनहल्ली, त्रिसुळी, महंमदशाई, रामनाथपुरी, चंदावरी, वेळुरी, कुनगोटी ही नाणी होती शिवाय चंद्रमे, निशाणी, येळुरी होनांची संख्या कोट्याहून अधिक होती.
____________________________
*शिवरायांचे चलन*
*भाग २*
इतकी सुवर्णनाण्यांची मोजदाद होती पण शिवरायांच्या काळी प्रामुख्याने तीन सुवर्णनाणी त्यांनी निर्मीली ती होन, पुतळी आणि मोहोर अशी होती या पैकी होन वजनाला २.७२८ ग्रॅम होता.
होनाची किंमत त्यावेळी साडेतीन ते चार रुपये,
पुतळीची किंमत पाच रुपये व
मोहोरची पंधरा रुपये होती.
सुवर्ण होनावर सुर्य, चंद्र, बेलाचे पान, वृक्ष आणि खंडा(तलवार) अशी चिन्हे आढळून येतात.
अशा प्रकारे हिंदवी स्वराज्यात शिवरायांनी परकीय चलन हद्दपार करून आपले चलन चालवले. जेणे करून परकीय सत्ता डोईजड होता कामा नये.
कालांतराने इंग्रजांनी हे सर्व चलन बंद करून स्वता:चे चलन चालवले आणि आपला देश पारतंत्र्यात गेला.
असा हा आपला दूरदृष्टी ठेवणारा राजा वेगळा भासतो.
Wednesday, 15 June 2016
शिवकालीन मराठ्यांचे शस्त्र आणि त्याचे शास्त्र :
शिवकालीन मराठ्यांचे शस्त्र आणि त्याचे शास्त्र :
छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वतंत्र राज्यस्थापना करताना आपल्या स्वराज्यात अनेक मूलभूत आणि महत्वाचे बदल केले.किल्ल्यांची बांधनी,नौसेनेची स्थापना,गनिमी काव्याचा वापर करुन मिळवलेले यश याबरोबर शेतकऱ्यांविषयीचे धोरण,रयतेला दिल्या जाणाऱ्या सवलती या आजही अभ्यास करण्यायोग्य महत्वपूर्ण आहेत.
शिवकाळात महाराजांशी निगडीत काही गोष्टींचे आजही जनसामान्यांना अप्रूप वाटते,जसे शिवरायांनी वापरलेली भवानी तलवार.आणि अफझलखान वधाच्या वेळेस वापरलेले गुप्तशस्त्र (बिचवा,वाघनखे)..!!
शिवरायांनी त्यावेळेस किल्ले,युद्ध करण्याच्या पद्धतीबरोबरच शस्त्रास्त्रांमधेही आमुलाग्र बदल केले.केवळ तलवार,भाले,पट्टा यांपलिकडेही अनेक शस्त्रे मराठ्यांनी मोठ्या प्रमाणात वापरले.
शिवकाळात सर्वात जास्त प्रमाणात सुधारना झालेले शस्त्र म्हणजे तलवार.या तलवारी आजही मराठा तलवारी म्हणून प्रसिद्द आहेत.त्यांच्या मुठीवरून मराठ्यांच्या तलवारीचा अंदाज येतो.त्या काळात तलवारी लोखंड आणि पोलादाच्या बनवल्या जात.तसेच पसरट गोलाकार आकाराच्या तलवारी,करवतीपात्याच्या तलवारी,दुधारी तलवारीही बनवल्या जात.शिवकालीन तलवारींच्या मुठी या आजही जगात प्रसिद्द आहेत.मराठा मुठ नावाने ओळखल्या जाणाऱ्या या मुठी राघुच्या तोंडाच्या आकाराची मुठ,गोलाकार मुठ,घोडमुखी मुठ,दास्तान लावलेली मुठ हे प्रकार प्रचलित आहेत.
शिवरायांनी वापरलेली (भवानी,जगदंबा) तलवार आणि तिचा इतिहास हा आजही फार प्रेरणादायी आणि अभ्यासपूर्ण आहे.
तसेच,मराठ्यांच्या वापरण्यात आलेले तोफा आणि बंदुका यांमधे मराठ्यांच्या निराळेपनाची छाप दिसून येते.शिवरायांच्या नंतर शाहू छत्रपतींच्या काळात आणि त्यानंतर मराठ्यांनी तोफा ओतन्याचे कारखाने चालु केले होते.शिवछत्रपतींनी सुद्धा तोफा ओतन्याचा प्रयत्न पुरंदर किल्ल्यावर केला होता,पण पुढे तो यशस्वी झाला नाही.महाराजांच्या आक्रमक युद्धशैलीत तोफांसारख्या अवजड सामुग्रीची अडचन होतीच. तरीही आरमार आणि किल्ल्यांवर ठेवण्यासाठी महाराजांनी तोफांमधे पाश्चात्यांकडून विकसित तंत्र घेतले.
आरमारी सैन्यात तोफांचे महत्त्व अनन्यसाधारण होते,हे पुढील उदाहराणांवरून दिसून येते.
जेव्हा कान्होजी आंग्रे ताब्यातील परकीय जहाज सोडण्यास तयार असले,तरीही त्यावरील तोफा,बंदुका वापस करण्यात उत्सुक नसत.
मराठ्यांनी वापरलेल्या इतर शस्त्र आणि त्यांच्या सुधारित शास्त्रावर अनेक अभ्यासपूर्ण नोंदी आहेत.
उदा. भाल्यासारखे दोरीने बांधलेले एक हत्यार मराठा योध्यांमधे फार लोकप्रिय होते.विटा असे नाव होते त्या शस्त्राचे..!!जागेवर उभारून लांबवर भाला फेकल्या जाई,आणि पुन्हा दोरीने वापस ओढुन घेतल्या जाई.जागेवर उभारून त्यांचे काम सोपे होत असे.
मराठ्यांनी वापरलेले शस्त्रे आजही आम्हासाठी एका अस्मितेपेक्षा जास्त आहेत.
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
Wednesday, 11 May 2016
बाजीरावपुत्र समशेर बहाद्दर
बाजीरावपुत्र समशेर बहाद्दर
'श्री बल्लाल चेरणी तत्पर | समशेर बहाद्दर निरंतर'
इ.स.1734 मधे बाजीराव-मस्तानी यांच्या पोटी समशेर चा जन्म झाला.जन्म झाल्याच्या काही काळानंतर बाजीरावांचा मृत्यु झाला आणि त्यामुळे मस्तानी ने आत्महत्या केली.लहान वयातच अजानतेपनी पोरकेपन आले.परंतु बाजीरावांच्या नंतर गादीवर आलेले नानासाहेब पेशवे यांनी समशेर ला संभाळले.त्याचे शिक्षण,लग्ने करुण दिले.समशेर वयात येताच एक ख़ासा सरदार आणि पेशवे घरन्याचा आप्त म्हणून ओळखला जाऊ लागला.त्याने अनेक मोहिमा मधे आपला सहभाग नोंदवलाच पण पराक्रमाची चुनुक दाखवली.मराठे आणि निजाम यांच्यात झालेल्या भालकी येथील लढाइमधे त्याने पराक्रम गाजवला.
नानासाहेब यांनी इंग्रजांशी संगनमत करुण तुळाजी आंग्रे यांच्या विरोधात मोहीम उघडली.याचे नेतृत्व खुद्द समशेर ने केले.पावसाळ्यात तब्बल 2 महीने वेढा देऊन त्याने रत्नागिरी चा किल्ला जिंकून घेतला आणि आंग्रेनचा पराभव केला.तसेच ग्वाल्हेर,कुम्भेरि या मोहिमे मधेसुद्धा त्याची उपस्थिती वर्णनीय होती.
त्याने स्वतः बुंदेलखंड येथे स्वतंत्र मोहीम काढली आणि पाउन कोटींचा मुलुख मराठा साम्राज्याला जोडला.
मारवाडचा राजा बिजेसिंग याने धोक्याने राणोजीपुत्र जयप्पा शिंदे यांचा खून केला.तेव्हा समशेर शिन्द्यांच्या मदतीला गेला.समशेर आणि शिंदे यांनी मिळून मारवाड,जयपुर चा सारा प्रदेश उध्वस्त केला आणि बिजेसिंग ला शरण आणले.
जेव्हा दिल्ली वर अहमदशाह अब्दालीचे आक्रमण झाले,तेव्हा मराठे उत्तरेत दिल्लीच्या संरक्षणासाठी गेले.परंतु,पानिपत येथे झालेल्या युद्धात अहमदशाह अब्दाली विजयी ठरला.पेशव्यांच्या हुजूरातीच्या फौजेमधे समावेश असणार्या समशेर बहाद्दर या पराभव आणि सदाशिवराव भाऊ आणि विश्वासराव यांच्या मृत्यूनंतर सूरजमल जाट कडे गेला.परंतु,आंगावर असणार्या प्रानांकित जखमांमुळे काही दिवसातच त्याचा भरतपुर येथे मृत्यु झाला.
रूपवान,पराक्रमी अशा समशेर बहाद्दर चे लग्न मेहराम बाई सोबत झाले होते.आणि बांदा चे ' पाहिले नवाब' होण्याचाही मान मिळवला होता..आपल्या पराक्रमाने....
अशा 'समशेर बहाद्दर' योद्धयाविषयी आपल्याला विसर पडने,ही दुर्दैवाची गोष्ट आहे.