Total Pageviews

Thursday, 16 June 2016

शिवकालीन गुडीपाडवा

सदर - शिवकालीन गुडीपाडवा
भाग २

हि मंडळी दिनांक ३ एप्रिल १६७४ ला दुपारी रायगडावर पोहचली.
आत्ता मित्रांनो, नारायण शेणवीने ४ एप्रिल १६७४ ला आपल्या इंग्रज कमिटीला मुंबईला लिहिलेल्या पत्रात   पुढे काय लिहीतोय ते पहा ते अत्यंत महत्वाचे आहे.

दिनांक २८ मार्च रोजी पाडव्याच्या निमित्ताने निराजीपंत गडावरून पाचाडला आले."
अशाप्रकारे जबरदस्त पुरावा आपल्या हाताला लागला आहे.
निराजीपंत रायगडाहुन पाचाडला इंग्रज वकीलाच्या भेटिस केव्हा आले ? 
उत्तर आहे पाडव्याला !

नारायण शेणवी इंग्रजांच्या मुंबई वसाहतीस पत्रात कधी लिहीतोय तर चैत्र शुद्ध अष्टमीला दिनांक ४ एप्रिल १६७४.

महाराष्ट्रीयनवासी नारायण शेणवी हा मनुष्य अनेक भाषांत तरबेज होता. अन मुंबई येथे इंग्रजांसाठी दुभाषी म्हणून कार्यरत होता.
तो स्वता: २९ एप्रिलला पाडव्याच्या निमित्ताने  निराजीपंत पाचाडला आपल्या घरी आले". असे लिहितो.

वरील ओळीत  महाराष्ट्रीयन सणासुदीस चांगलेच ओळखणारा शेणवी "पाडवा" ह्या सणाचा अगदी स्पष्ट उल्लेख करतो व निराजीपंत आपल्या   सहकुटुबांसोबत जो सण साजरा करण्यास घरी आले तो पाडवा "दिवाळी - पाडवा" नव्हता तर चैत्र शुध्द प्रतिपदेचा दिन होता. हिंदू नववर्षाचा हा पहिला दिवस होता.

म्हणूनच निराजीपंत तो हिंदू नववर्षाचा प्रथम दिवस "गुडीपाडवा" आपल्या  सहकुटुंबासोबत साजरा करण्यास आपल्या घरी आले होते.

थोड्याच वेळात शेवटचा भाग !

No comments:

Post a Comment