शिवकालीन गुडीपाडवा
भाग १
मार्च १६७४ ला मुंबईच्या इंग्रज सल्लागार समितीने एका ठरावामार्फत वकील हेन्री ऑक्झिडेन व दुभाषी नारायण शेणवी यांस राजधानी रायगडावर शिवरायांची भेट घेण्यासाठी पाठवले होते. ते दोघे व त्यांचे इतर दोन सहकारी २४ मार्च १६७४ ला पाचाडला प्रथम प्रल्हाद निराजी आवजी पंडित (अष्टप्रधान मंडळातील प्रमुख न्यायाधीश) ह्यांची भेट घेण्यास आले. मात्र प्रल्हाद निराजीपंत रायगडावर होते. म्हणून नारायण शेणवीने तसा रायगडावर वर्दी धाडली.
रायगडावरून निराजीपंतानी निरोप पाठवला की,
"शिवरायांची एक भार्या म्हणजे महाराणी काशीबाईसाहेब नुकत्याच मरण पावल्याने महाराज सध्या सुतकात आहेत".
म्हणून सुतक फिटेपर्यंत तुम्ही म्हणजे हेन्री ऑक्झिडेन, दुभाषी नारायण शेणवी व इतर दोघे थेट गडावर न येता पाचाडातील माझ्या घरी रहावे. पाचाडात हि सर्व मंडळी २९ मार्च ते २ एप्रिल पर्यंत एका स्वतंत्र खोलीत राहिले. नारायण शेणवी व हेन्रीने पाच दिवस पाचाडात रिकामटेकडेपणात घालवले. अशी नोंद त्याने डायरीत केली आहे.
No comments:
Post a Comment