Total Pageviews

Thursday, 16 June 2016

शिवकालीन गुडीपाडवा

सदर - शिवकालीन गुडीपाडवा
भाग ३
शेवटचा टप्पा..

शिवरायांच्या काळात पाडवा सण साजरा होत नसता, तर नारायण शेणवीने त्या दिवसाचा उल्लेखच "पाडव्याच्या निमित्ताने निराजीपंत घरी आले" असा केलाच नसता.

रुढी-परंपरा चालीरीती अन सणसुद हे आपल्या  संस्कृतीत पिढ्यानुपिढ्या चालत येत असतात.
मागील पिढीकडुन पुढच्या पिढीकडे पाझरत येत असतात.
संस्कारातुन आजी आजोबांकडुन नातवाकडे येत असतात.

शिवकाळात  "गुढी- पाडवा" सण साजरा होत होता ह्याचा अतिशय स्पष्ट उल्लेख दुभाषी नारायण शेणवीने आपल्या चैत्र शुध्द अष्टमीला (४ एप्रिल १६७४) ला थेट राजधानी रायगडाहुन लिहिलेल्या पत्रात देतोय.

अशा प्रकारे समाजात दुही माजवणाऱ्या संघटनांना वैचारिक पातळीवर आपण शांत करू शकतो. म्हणून हा लेख प्रपंच !!

शिवकालीन गुडीपाडवा हि सदर संपली.

No comments:

Post a Comment