*शिवरायांचे चलन*
*भाग १*
राज्याभिषेकापूर्वी म्हणजेच १६६४ च्या दरम्यान छत्रपती शिवरायांनी पहिले चलन (नाणे) प्रसिध्द केले या नाण्यावर "जी" व "सी" ही अक्षरे आढळून येतात ह्या नाण्याचे वजन अंदाजे पाऊण तोळा आहे हे स्वराज्याचे पहिले नाणे होते !
१५६५ साली विजयनगरचा सम्राट सदाशिवराय हा बहामनी सत्तेकडून पराभूत झाल्यानंतर १०० वर्षे आपण परकिय चलन आपण वापरत होतो.
छत्रपतींनी हे नाणे अस्तित्वात आणून ही कोंडी फोडली ह्यानंतर महाराजांनी "शिवराई" हे चलन अस्तित्वात आणले जे पेशवाईच्या अस्तापर्यंत म्हणजेच १८६० पर्यंत बाजारात चलन म्हणून वापरली जात होती.
६ जून १६७४ म्हणजेच शिवराजाभिषेक यासमयी छत्रपतींनी "सुवर्णहोन" हे चलन अस्तित्वात आणले शिवरायांच्या मृत्युसमयी स्वराज्याच्या तिजोरीच्या झालेल्या मोजणीवरून सभासद संदर्भ असा की, तिजोरीत सर्व नाणी मिळून ७९ लाखाच्या पुढे होती.
त्यात सुवर्णहोन ४ लाखापेक्षा जास्त होती त्यात इतर सुवर्णनाण्यांचे प्रकार गंबार, मोहरा, पुतळ्या, पातशाही होन, सनगरी, अच्युतराई, देवराई, रामचंद्रराई, गुत्तीहोन, धारवाडी, सतलाम्या, इभ्रराम्या, शिवराई, कावेरी पाक, प्रलयघटी, पाक नाईकी, आदवणी, जडमाल, ताडपत्री, आफरजी, बिलधरी, वेंकेटराई, उलफकरी, देवनहल्ली, त्रिसुळी, महंमदशाई, रामनाथपुरी, चंदावरी, वेळुरी, कुनगोटी ही नाणी होती शिवाय चंद्रमे, निशाणी, येळुरी होनांची संख्या कोट्याहून अधिक होती.
____________________________
*शिवरायांचे चलन*
*भाग २*
इतकी सुवर्णनाण्यांची मोजदाद होती पण शिवरायांच्या काळी प्रामुख्याने तीन सुवर्णनाणी त्यांनी निर्मीली ती होन, पुतळी आणि मोहोर अशी होती या पैकी होन वजनाला २.७२८ ग्रॅम होता.
होनाची किंमत त्यावेळी साडेतीन ते चार रुपये,
पुतळीची किंमत पाच रुपये व
मोहोरची पंधरा रुपये होती.
सुवर्ण होनावर सुर्य, चंद्र, बेलाचे पान, वृक्ष आणि खंडा(तलवार) अशी चिन्हे आढळून येतात.
अशा प्रकारे हिंदवी स्वराज्यात शिवरायांनी परकीय चलन हद्दपार करून आपले चलन चालवले. जेणे करून परकीय सत्ता डोईजड होता कामा नये.
कालांतराने इंग्रजांनी हे सर्व चलन बंद करून स्वता:चे चलन चालवले आणि आपला देश पारतंत्र्यात गेला.
असा हा आपला दूरदृष्टी ठेवणारा राजा वेगळा भासतो.
No comments:
Post a Comment