Total Pageviews

Showing posts with label शिवकालीन गुडीपाडवा. Show all posts
Showing posts with label शिवकालीन गुडीपाडवा. Show all posts

Thursday, 16 June 2016

शिवकालीन गुडीपाडवा

सदर - शिवकालीन गुडीपाडवा
भाग ३
शेवटचा टप्पा..

शिवरायांच्या काळात पाडवा सण साजरा होत नसता, तर नारायण शेणवीने त्या दिवसाचा उल्लेखच "पाडव्याच्या निमित्ताने निराजीपंत घरी आले" असा केलाच नसता.

रुढी-परंपरा चालीरीती अन सणसुद हे आपल्या  संस्कृतीत पिढ्यानुपिढ्या चालत येत असतात.
मागील पिढीकडुन पुढच्या पिढीकडे पाझरत येत असतात.
संस्कारातुन आजी आजोबांकडुन नातवाकडे येत असतात.

शिवकाळात  "गुढी- पाडवा" सण साजरा होत होता ह्याचा अतिशय स्पष्ट उल्लेख दुभाषी नारायण शेणवीने आपल्या चैत्र शुध्द अष्टमीला (४ एप्रिल १६७४) ला थेट राजधानी रायगडाहुन लिहिलेल्या पत्रात देतोय.

अशा प्रकारे समाजात दुही माजवणाऱ्या संघटनांना वैचारिक पातळीवर आपण शांत करू शकतो. म्हणून हा लेख प्रपंच !!

शिवकालीन गुडीपाडवा हि सदर संपली.

शिवकालीन गुडीपाडवा

सदर - शिवकालीन गुडीपाडवा
भाग २

हि मंडळी दिनांक ३ एप्रिल १६७४ ला दुपारी रायगडावर पोहचली.
आत्ता मित्रांनो, नारायण शेणवीने ४ एप्रिल १६७४ ला आपल्या इंग्रज कमिटीला मुंबईला लिहिलेल्या पत्रात   पुढे काय लिहीतोय ते पहा ते अत्यंत महत्वाचे आहे.

दिनांक २८ मार्च रोजी पाडव्याच्या निमित्ताने निराजीपंत गडावरून पाचाडला आले."
अशाप्रकारे जबरदस्त पुरावा आपल्या हाताला लागला आहे.
निराजीपंत रायगडाहुन पाचाडला इंग्रज वकीलाच्या भेटिस केव्हा आले ? 
उत्तर आहे पाडव्याला !

नारायण शेणवी इंग्रजांच्या मुंबई वसाहतीस पत्रात कधी लिहीतोय तर चैत्र शुद्ध अष्टमीला दिनांक ४ एप्रिल १६७४.

महाराष्ट्रीयनवासी नारायण शेणवी हा मनुष्य अनेक भाषांत तरबेज होता. अन मुंबई येथे इंग्रजांसाठी दुभाषी म्हणून कार्यरत होता.
तो स्वता: २९ एप्रिलला पाडव्याच्या निमित्ताने  निराजीपंत पाचाडला आपल्या घरी आले". असे लिहितो.

वरील ओळीत  महाराष्ट्रीयन सणासुदीस चांगलेच ओळखणारा शेणवी "पाडवा" ह्या सणाचा अगदी स्पष्ट उल्लेख करतो व निराजीपंत आपल्या   सहकुटुबांसोबत जो सण साजरा करण्यास घरी आले तो पाडवा "दिवाळी - पाडवा" नव्हता तर चैत्र शुध्द प्रतिपदेचा दिन होता. हिंदू नववर्षाचा हा पहिला दिवस होता.

म्हणूनच निराजीपंत तो हिंदू नववर्षाचा प्रथम दिवस "गुडीपाडवा" आपल्या  सहकुटुंबासोबत साजरा करण्यास आपल्या घरी आले होते.

थोड्याच वेळात शेवटचा भाग !

शिवकालीन गुडीपाडवा

शिवकालीन गुडीपाडवा
भाग १

मार्च १६७४ ला मुंबईच्या इंग्रज सल्लागार समितीने एका ठरावामार्फत वकील हेन्री ऑक्झिडेन व दुभाषी  नारायण शेणवी यांस राजधानी रायगडावर शिवरायांची भेट घेण्यासाठी पाठवले होते. ते दोघे व त्यांचे इतर दोन सहकारी २४ मार्च १६७४ ला पाचाडला प्रथम प्रल्हाद निराजी आवजी पंडित (अष्टप्रधान मंडळातील प्रमुख न्यायाधीश)  ह्यांची भेट घेण्यास आले. मात्र प्रल्हाद निराजीपंत रायगडावर होते. म्हणून नारायण शेणवीने तसा रायगडावर वर्दी धाडली.

रायगडावरून निराजीपंतानी निरोप पाठवला की,
"शिवरायांची एक भार्या म्हणजे महाराणी काशीबाईसाहेब नुकत्याच मरण पावल्याने महाराज  सध्या सुतकात आहेत".
म्हणून सुतक फिटेपर्यंत तुम्ही म्हणजे हेन्री ऑक्झिडेन, दुभाषी नारायण शेणवी व इतर दोघे थेट गडावर न येता पाचाडातील माझ्या घरी रहावे. पाचाडात हि सर्व मंडळी २९ मार्च ते २ एप्रिल पर्यंत एका स्वतंत्र खोलीत राहिले. नारायण शेणवी व हेन्रीने पाच दिवस पाचाडात रिकामटेकडेपणात घालवले. अशी नोंद त्याने डायरीत केली आहे.