शिवछत्रपती व दुर्गबांधणी भाग : २
औरंगजेबाला माहिती होते की, एकेक गड घेत बसणे मुर्खपणाचे होते. याने मराठा राज्य संपणार नव्हते. तरीही त्याने आपले प्रयत्न चालूच ठेवले, आपण मोगल साम्राज्याचा विनाश ओढवून घेत आहोत हे तो जाणून होताच पण आपली जिद्द सोडण्यास तो तयार नव्हता. याचे कारण सांगताना औरंगजेब म्हणतो, " ही मोहिम ( स्वराज्यावरील हल्ला ) काढण्यात माझा हेतू केवळ जिहाद करणे हा आहे. या सेवेने परमेश्वर आणि पैगंबर हे संतुष्ट होवोत. उद्या मी स्वार होऊन किल्ल्यावर हल्ला करीन आणि काफर वधाचा ध्वज उभा करीन " साकी मुस्तेदखान वसंतगढ वेढ्याच्या वेळी.
विसाव्या शतकातील विचारवंत सुलेमान मदवा म्हणतात, " दाराशुकोहच्या ( औरंगजेबाचा थोरला भाऊ ) हाती मोगलांचे राज्य असते तर मोगलांचे राज्य पुढे बरेच वर्ष चालले असते. पण भारतातून इस्लाम नष्ट झाला असता. औरंगजेबाच्या हाती मोगलांचे साम्राज्य नाहिसे झाले, पण इस्लाम शिल्लक राहिला." आणि खरोखरीच औरंगजेब इतका धर्मवेडा होता की, वसंतगड घेतल्या नंतर अनेक मराठे व राजपूत सरदारां देखत गडावरील मंदिर पाडून स्वतःच्या हाताने त्याने मशिदीचा पाया घातला. नोव्हेंबर १६९९
शिवरायांनी उभारलेल्या गडकोटानी मोगल साम्राज्य खिळखिळ करून सोडले सह्याद्रीच्या अंगाखांद्यावर त्यांनी असंख्य दुर्ग उभे करून सह्याद्रीला आपल्या अंकित केले. सिंधुसागरावर दुर्ग उभे केले. ते जतन केले. त्यामुळेच ते गडपती बनले.
No comments:
Post a Comment