आबाजी विश्वनाथ प्रभु(१६३१-१६९४)
नेहमी बाजी पासलकर यांच्यासोबत राहून शिवाजी महाराजांच्या स्वराज्य स्थापनेच्या उद्योगात सहभाग होता. महाराजांच्या बालपणीपासूनच्या सोबतींमधील एक. पुढे त्यांना महाराजांनी सरदारकी दिली. भोर मावळातील रोहिड्याच्या मोहिमेत यांना प्रत्यक्ष सेवेत घेऊन यांच्यावर मोठी कामगिरी सोपविली होती. जावळीच्या मोरे प्रकरणातही यांनी चांगले शौर्य गाजिवेले. याही प्रसंगी त्यांनी मुरारबाजी देशपांडे यांना समजावून आणि मध्यस्थी करुन स्वराज्य सेवेत रुजू केले. छत्रपती संभाजी महाराज यांच्या कारकिर्दीत सुद्धा अनेकवेळा मोघलांशी रणसंग्राम करुन मैदान गाजविले. सेनापति खंडेराव गोमाजी पानसंबळ याच्या हाताखालीं राहून, आणि ‘शिवाजी महाराजांचा लोभ व राजाराम महाराजांची आज्ञा, तसेंच स्वराज्याचा अभिमान हीं चित्तात आणून, जिवाची पर्वा न बाळगतां, मोंगल फौजेशीं लढण्याचा त्यांनी क्रम चालविला. या त्यांच्या पराक्रमाबद्दल राजाराम महाराजांनी सेनापतीच्या सांगण्यावरून त्यास नवीन इनामे करून दिलीं. रामचंद्रपंताने मोंगलाच्या हातांतून दाभोळप्रांत परत मिळविण्याकरितां शंकराजी नारायण गांडेकर यास व आबाजी विश्वनाथ यांना पाठविलें. १६९४ मध्ये तोरणा मोहिमेत मुघलांचा वेढा पडलेला असताना वृद्धापकाळात सुद्धा स्वराज्याची निष्ठा पणाला लावून लढले आणि याच वेळी त्यांना वीरमरण आले. यांना मुलगा होता त्याचं नाव अंताजी(जनाजी) अस होत.
महाराष्ट्रातील_शुर_सरदार_घराणी
No comments:
Post a Comment