कावजी कोंढाळकर
यांचे घराणे कान्होजी जेध्यांच्या ऋणानुबंधी आणि जीवास जिव देणारे होते. जेध्यांचे हाडवैरी बांदल यांच्याशी झालेल्या झुंजित कावजीचा थोराला भाऊ पोसाजी ठार झाला होता. तेंव्हा पासून कान्होजींनी यांचा सांभाळ केला. कान्होजींचा जसजसा उत्कर्ष झाला तसा कावजींचा ही होत गेला. अफझलखान वध प्रसंगी पालखी वाहणाऱ्या भोयांचे पाय छाटुन टाकले. खाशा अफझलखानाचे शीर सहस्ते कापण्याची महत्वाची कामगिरी कावजींनी केली. त्यास शिवाजी राजांच्या पायदळात हजाराची सरदारी होती. शाइस्तेखानाचे दोन सरदार बुलाखी आणि नामदारखान कुलाबा जिल्ह्यात गड़बड़ करीत होते. तेंव्हा देइरी गडावर कावजींची नेमणूक होती. इ.स. १६६३ मध्ये मोठ्या पराक्रमाने या दोन खानांचा वेढा त्यांनी उठविला.
No comments:
Post a Comment