लाय पाटिल-
शिवाजी महाराजांच्या आरमारातील एक खलाशी. कोळवाड(चौल-अष्टागार) चे रहिवाशि. सुभानजी खराडे सरनोबत आणि सुभानजी हवालदार यांच्या शिफारशीने आरमारात दाखल झाले. शिवाजी महाराजांनी १६६१-६२ मध्ये शामराव राजेकर पेशवा व रोहिड्याचे किल्लेदार बाजी घोलप यांना जंजीऱ्यावर मोहिमेस पाठवले. त्यावेळी या मोहिमेत लाय पाटिल यांचा सहभाग होता. पेशवे मोरोपंत पिंगळ्यांनी १६७६ मध्ये जंजिऱ्याची मोहीम काढली तेंव्हा तटाला शिड्या लावण्याची जोखिम पटलांनी केली. पण मोरोपंतांची माणस वेळेवर भेटू शकली नाहीत आणि धाडस फुकट गेले. तथापि महाराजांनी त्यांचा सत्कार करुन पालखिचा मान दिला पण लाय पाटलांनी तो नम्र पणे नाकारला तेंव्हा महाराजांनी त्यांना एक गलबत बांधून दिले आणि त्याला नाव दिले ' पालखी ' . बादशाहने त्यांना आधीच पाटिलकी दिली होती म्हणून महाराजांनी त्यांना ' सरपाटिल ' किताब दिला.
No comments:
Post a Comment