Total Pageviews

Saturday, 31 October 2015

राजेबहाद्दर दाणी - नारो शंकर

राजेबहाद्दर दाणी - नारो शंकर

हे शुर व पराक्रमी ब्राम्हणसरदार तलवार बहाद्दर होते. प्रथम उदाजी पवारांच्या हाताखाली होते. माळव्यातील राजकारणात उदाजी पवारांच्या हाताखाली हे होते(१७२०). १७३० मध्ये ते मल्हारराव होळकरांच्या पदरी होते. होळकरांच्या तर्फे इंदूरचे सुभेदार होते. १७४२ मध्ये त्यांनी ओरछा जिंकले. पुढे झांसी येथे राहून १४ वर्षे त्यांनी कारभार केला. त्यांना जरीपटका, नौबत व १५ लाखांचा सरंजाम होता. त्यांच्या बद्दल तक्रारी आल्यावर पेशव्यांनी त्यांना पुन्हा बोलाविले. त्यानंतर त्यांनी गुजरात च्या मोहिमेत पराक्रम गाजविला. कर्नाटकातील सावनुरच्या मोहिमेत हे अग्रभागी होते. दत्ताजी शिंदे यांच्या मध्यस्थिने पुन्हा पेशव्यांची मर्जी प्रसन्न होऊन त्यांची रवानगी उत्तरेत झाली(१७५७). राघोबा काही काळ पेशवा होता तेंव्हा प्रतिनिधीची बडतर्फी होऊन त्यांच्या जागी यांची नेमनुक झाली. नारो शंकर हे राघोबा दादांचे लाडके सरदार होते. याच्या ताब्यात दिल्ली असता त्यांनी बादशाहाचे एका रक्षण केले म्हणून बादशाह ने त्यांना ' राजेबहाद्दर ' किताब दिला आणि मालेगाव जहागिरि देऊन सरंजाम ही दिला. १७४० मध्ये त्यांनी मालेगावात किल्ला बांधला. नाशिक येथे रामेश्वर देवालय बांधले. तेथे एक प्रचंड घंटा वैशिष्ट्यपूर्ण आहे ती यांचीच निर्मिती. काही काळ शिंदयांचे दीवाण होते. राघोबा दादांच्या मृत्युनंतर मात्र उदास आणि दुर्लक्षित झाले. राघोपंत आणि त्रिंबकराव असे दोन पुत्र त्यांना होते.

No comments:

Post a Comment