शिदनाक महार(१६९७-१७०८)
हे साताऱ्याजवळील कळंबी गावचे वतनदार. औरंगजेबच्या हातून संभाजी राजांची हत्या करण्यात आली तेंव्हा महाराष्ट्रभर जी बंडाळी माजली त्यात शिदनाक महार यांनी पलटन जमवून मुघलांविरुद्ध मोठीच धामधुम काही काळ केली. शाहू महाराज कैदेतून सुटुन पुन्हा राज्यात आले तेंव्हा यांची निष्ठा शाहू राजांना सामिल झाली. यात शाहू महाराजांनी यांना कळंबी गाव इनाम दिला. १७९५-१८१८ या काळात यांचा नातू शिदनाक होऊन गेला. तो खर्ड्याच्या लढाईत होता. छावणित याच्या तंबू भोवती ब्राम्हण, सरदार यांचे तंबू होते. त्यांनी विनंती केली केली की महाराचा तंबू दूर करावा. सरदार पाटणकरांनी परस्पर उत्तर दिले की, ही जेवणाची पंगत नाही. ही शुर-विरंची पंगत आहे. यात जातिपातीचा विचार नाही. महाराचा तंबू हलवण्याची गरज नाही. निकराच्या हल्ल्याच्या दिवशी महाराने पेशव्यास हात जोडून विनंती केली की मी महार आहे म्हणून सारे माझा तिरस्कार करतात, आज मी काय कामगिरी करतो ती उघड्या डोळ्यांनी पहावि. त्या लढाईत त्याने तलवार गाजवली. पटवर्धन मंडळी खुश झाली. इनाम दिले. पेशवाई बुडाल्यावर हां बराच वर्षे होता. चिंतामणराव पटवर्धन आजारी असता हां त्याच्या समाचारास गेला तेंव्हा मोठा समारंभ करुन सऱ्यांना त्याची हयात ओळख पटवर्धनानी करुन दिली.
यात भरपूर चुका आहेत तर जेवणाची पंगत नाही तर लग्नाची पंगत असा उल्लेख आहे हे उत्तर पपाटणकरा ने नव्हत दिल तर ते उत्तर हंबीरराव मोहिते ने दिल होत.. इतिहासाचा योग्य अभ्यास करूनच माहिती लिहावी...
ReplyDelete