मराठे उत्तरेत मैदान मारत होते या दरम्यान दक्षिणेत काही प्रमाणात मराठ्यांचे लक्ष थोडे कमी झाले होते म्हणून हैदर अलीसारख्यांना दक्षिणेत पाय रोवणे सोपे झाले चिक्ककृष्णराज आणि त्याच्या प्रधानांना कैद करून त्यांची सत्ता बळकावली. मराठ्यांच्या ताब्यात असलेले शिरा, हासकोट हे भागही तत्यानं बळकावले तेव्हा त्याचा बंदोबस्त करण्यासाठी महाराष्ट्रातून मराठ्यांना येणे भाग पडले
त्यावेळी दक्षिणेत आपले पाय रोवून खंबीरपणे आपले संस्थान चालवणारे मुरारराव घोरपडे यांच्या देखरेखीखाली महाराष्ट्रातून खाली कर्नाटकात उतरलेल्या सैन्याने हैदरच्या मुसक्या आवळायला सुरवात केल्या. नुकतेच गमावलेललं शिरा हे ठानं दहा दिवसात परत घेण्यात आलं जवळचाचा मदगिरीचा पहाडीदुर्गही मराठ्यांनी जिंकला. यानंतर मोठ्या जोश्यात असणाऱ्या मराठा सैन्याने आपला मोर्चा आता गुर्रमकोंड्याकडे वळविला
ऐन पावसाळ्यात मराठ्यांनी गुर्रमकोंड्याला वेढा घातला. यावेळी हैदरअली चा एक सरदार मीर रेझा याचा भाऊ सैदू मिया यावेळी किल्ल्यावर होता. एककाळ होता जेव्हा हा सैदू मिया मराठ्यांची चाकरी करत होता; पण आता तो हैदरच्या बाजूने उभा होता. एकाबाजूने त्र्यंबकराव पेठेयांनी मोर्चापार खंदकाला नेऊन भिडवला. व तीन - चार ठिकाणी सुरुंग पेरण्यासाठी भुयारंहि खणली. तुटपुंज्या साधन-सामुग्रीमुळे किल्ल्यावरील सैन्याचासुद्धा धीर खचत चालला होता. साठा संपल्यानं घोडा आणि गाय मारून लोक खाऊ लागले होते.
२ ऑक्टोबर १७७० रोजी मराठ्यांनी पेरलेला एक सुरुंग उडवण्यात आला, तटाला मोठे भगदाड पडले. त्याबरोबर मराठी फौज त्या भगदाडातून आत घुसली. इतरही सुरुंग उडाले आणि लोकं टेकिस आले आणि त्यांनी शस्त्रे खाली टाकून तहाची बोलणी सुरु केली. १९ ऑक्टोबरला गुर्र्मकोंड्याच्या किल्ल्यावर मराठा निशाण फडफडू लागले. गुर्र्मकोंडा मराठ्यांच्या हाती लागल्यानं हैदर पुरता हादरून गेला होता
(1) १८०२ साली मद्रास इंजिनीय सर्वेक्षक थोमस फ्रासेर यांनी शाईनं काढलेला हा गुर्र्मकोंड्याचा नकाशा
2) गुर्रमकोंड्याचं एक अस्सल चित्र
३) मराठ्यांच्या चढाईनं हैराण झालेला हैदर अली )
No comments:
Post a Comment