हंबीरराव मोहिते
यांचे मूळ नाव हंसाजी मोहिते.
नेसरीच्या लढाईत प्रतापराव यांच्या मृत्युमुळे मराठा
सैन्य बिथरले गेले.
मराठा सैन्य बहलोलखानाकडून पराभव होण्याच्या बेतात असताना ऐन
वेळी हंसाजी मोहिते यांनी
आपल्या ताज्या दमाच्या सैन्यासह बहलोल खानाच्या सैन्यावर धाड
घालून पराभवाचे रुपांतर विजयात केले.
या पराक्रमासाठी हंसाजी मोहिते यांना
महाराजांनी 'हंबीरराव' हा किताब दिला.
18 एप्रिल 1674 रोजी चिपळूण येथे
महाराजांनी आपल्या सैन्याची
पाहणी केली त्यावेळी
हंबीररावांना सरनौबत (मुख्य सेनापती)
केले.
जानेवारी 1677 मध्ये
हंबीररावांनी गदग प्रांतावर
स्वारी करून कोप्पळ जिल्ह्याचा मुख्य
अधिकारी विजापुरी सरदार हुसेनखान मियाना
यांचा येलबुर्ग्याजवळ पराभव केला.
*महाराजांनी भागानगर (हैद्राबाद)
भेटीवेळी सोबत *1677
व्यंकोजींचा अहिरी येथे पराभव *16
नोव्हेंबर 1679 जालना येथे मोघलांच्या लढाईत जखमी
*शिवरायांची पत्नी सोयराबाई साहेब यांचे भाऊ
सरसेनापती हंबीररावांना मानाचा मुजरा
जय शिवराय..!
No comments:
Post a Comment