Total Pageviews

Monday, 12 October 2015

छत्रपती शिवाजी महाराजांचे सर्वात जुने २८ जानेवारी १६४६ चे पत्र.

छत्रपती शिवाजी महाराजांचे सर्वात जुने २८ जानेवारी १६४६ चे पत्र.

हे पत्र शिवाजी महाराजांनी वयाच्या १६ व्या वर्षी लिहिले आहे.
अद्याप असलेले हे त्यांचे सर्वात जुने पत्र आहे. रांजे गावच्या भिकाजी
मोकादमाकडून काही बदअमल झाला म्हणुन त्या विषयी महाराजांनी
त्याला त्याचे हात पाय तोडुन शिक्षा दिली व त्याचे वतन सरकार जमा
केले. त्या विषयीचे हे पत्र आहे. पत्र अस्सल आहे व भारत इतिहास संशोधन
मंडळात आहे.
पत्राची तारीख "सन सित अर्बेन अलफ़" असा आहे. तो सध्याच्या चालु
इंग्रजी कालगनने नुसार त्याची तारीख "२८ जानेवारी १६४६" अशी येते.
जुन्या मराठी कागदपत्रांमध्ये शुहूर सन आकड्यांत लिहिलेला नसतो. तो
अक्षरांमध्येच लिहिलेला असतो. त्याकरीता संख्यावाचक अरबी शब्द
वापरलेले असतात.

No comments:

Post a Comment