Total Pageviews

Wednesday, 9 September 2015

शिवाजी‬ ‪‎महाराजांची‬ ‪‎राजचिन्हे‬ :‎श्री भवानीदेवी‬ ‪‎प्रतापगड‬



‪#‎श्रीभवानीदेवी‬ ‪#‎प्रतापगड‬ :-
श्री शिवाजी महाराजांची श्री भवानी देवीवर नितांत भक्ति होती. तुळजापुरची श्री भवानी महाराजांची कुलदेवताच होती. परंतु आदिलशाही अमलांत असलेल्या तुळजापुरास दर्शनासाठी जाणे महाराजांना अशक्यच होत असे. म्हणून इ.१६६१ च्या कोकणातील श्रृंगारपुर स्वारीनंतर महाराजांनी किल्ले प्रतापगडावर श्री भवानी देवीच्या मूर्तीची स्थापना केली. प्रतापगडावरच देवीची स्थापना करण्यात औचित्य होते. कारण प्रतापगडाखालीच महाराजांना अफजलखानाविरुद्ध प्रचंड विजय मिळाला होता.
मंबाजीनाईक पाणसरे या विश्वासु माणसाकडून महाराजांनी त्रिशुळ गंडकी नदीच्या पात्रातील शिळा आणविली व त्या शिळेची ही मूर्ति घडविली. त्रिशुळगंडकी नदी भारताच्या ईशान्य सीमेवर आहे. ही अष्टभुजा मूर्ति सुंदर आहे. श्रीच्या पूजाअर्चेची व्यवस्था महाराजांनी उत्तम प्रकारे लावली.
कोणत्याही महत्वाच्या योजनेला प्रारंभ करण्यापूर्वी महाराज प्रतापगडावर येऊन श्री भवानीचे दर्शन घेत असत. राज्याभिषेकापूर्वी दि. २० मे १६७४ रोजी महाराजांनी या देवीची पूजा करून तिला सोन्याचे छत्र अर्पण केले. महाराज तर स्वतःला श्रीभवानीचे ' भोपे ' , म्हणजे पुजारी-भक्त म्हणवून घेत.

http://itihasbynikhilaghadeblogspot.com

No comments:

Post a Comment