#राजदुंदुमी :-
सार्वभौम राजाच्या मिरवणुकीत आघाडीवर नगारा वाजत असे. हा नगारा हत्तीवार असे. नगारा वाजवणारा माणूस अखंडपणे हा नगारा वाजवीत असे. यालाच #राजदुंदुमी म्हणत. या राजदुंदुमीची सार्वभौम राजचिन्हात गणना होत असे. बादशाही रियासतीत या दुंदुमीला#शाहीनोैबत म्हणत. या नोैबतीस #धौशा असेही म्हणत. या राजदुंदुमीचा हत्ती अलंकारांनी आणि गजघंटांनी सुंदर सजवलेला असे.
छत्रपति शिवाजीमहाराजांची मिरवणूक राज्याभिषेकानंतर निघाली, त्यावेळी मिरवणुकीच्या आघाडीवर अशीच हत्तिवरचि राजदुंदुमि झडत होती. ही नौबत आकाराने भव्य असल्यामुळे तिचा आवाजही मोठा आणि गंभीर असे. हत्ती हे वैभवाचे आणि राजपदाचे प्रतिक समजले जात असल्यामुळे मिरवणुकीतील या राजदुंदुमिच्या हत्तीचा दिमाख उत्कृष्ट प्रकारे सांभाळला जात असे.
छत्रपति शिवाजीमहाराज दक्षिण दिग्विजयार्थ निघाले तेव्हा त्यांच्या स्वारित राजदुंदुमी होती. गोवळकोंडयाच्या अबुल हसन कुतुबशहाला भेटण्यासाठी महाराज भागानगर शहरात मिरवणुकीने प्रवेशले, तेव्हा आघाडीवर अशीच डौलदार हत्तीवरचि राजदुंदुमी दुमदुमत होती.
मुघल बादशाहांच्या दरबारांत #शाहिनौबत व #नगारखाना हे स्वतंत्र खातेच असे. रायगडावरहि #नगारखाना हे एक महत्वाचे खाते होते. दुःखवटयाचे प्रसंगी नौबत बंद ठेवीत असत.

No comments:
Post a Comment