#छत्र :-
' छत्र ' हे सार्वभौमत्वाचे चिन्ह आहे. छत्र धारण करणारा राजा कधीही कोणाचा मांडलिक नसतो. शिवाजी महाराजांनी छत्र धारण तर केलच; पण स्वत:ला ' छत्रपति राजा ' म्हणवून घेतले. महाराष्ट्राच्या आजपर्यंतच्या ज्ञात इतिहासांत स्वत:ला ' छत्रपति ' म्हणवून घेणारा शिवाजीराजा हा पहिलाच राजा आहे.

' छत्र ' हे राजाच्या मस्तकावर झळकणारे राजवैभवाचे चिन्ह आहे. पण त्याचबरोबरच राजाच्या शिरावर येणाऱ्या जबाबदारीचेही ते प्रतिक आहे. छत्र म्हणजे निवारा. छत्र म्हणजे संरक्षण. आपल्या राष्ट्राचे, मायभूमिचे आणि प्रजाजनांचे संरक्षण कारणाऱ्यांची आणि त्यांना सुखाचा निवारा देण्याची जबाबदारी राजाची असते. राजाने छत्र करावयाचे तें भुमीचे आणि प्रजेचे पालन-पोषण-संगोपन आणि संरक्षण करण्याच्या घेतलेल्या व्रत-कर्तव्याचे प्रतीक म्हणून ! केवळ शोभेचा अलंकार म्हणून नव्हे ! याच दृष्टीने शिवजी महाराज खऱ्या अर्थाने छत्रपति होते.
छत्रपति शिवजीमहाराजांच्या छत्राचा दंड व कळस सोन्याच्या होता.
छत्रपति शिवजीमहाराजांच्या छत्राचा दंड व कळस सोन्याच्या होता.

No comments:
Post a Comment