Total Pageviews

Wednesday, 9 September 2015

‎शिवाजी‬ ‪‎महाराजांची‬ ‪‎राजचिन्हे :‎राजमुद्रा



दोन प्रकारच्या मुद्रा आपणास पहावयास मिळतात ‪#‎प्रतिपचंद्र‬ व ‪#‎मर्यादेयं‬ ‪#‎विराजते‬ .
छत्रपति शिवाजी महाराजांची राजमुद्रा व पत्रपूर्तीची छोटी मुद्रा संस्कृत भाषेतील होती. शब्द असे काव्यबध्द होते.
या मुद्रेचा अर्थ असा ' शहाजीराजांचे पुत्र शिवाजीराजे यांची ही मुद्रा प्रतिपदेच्या चंद्रकोरी प्रमाणे वर्धिष्णु आणि विश्ववंद्य आहे. ही राजमुद्रा कल्याणकारी असून ती विलसत आहे.
ही मुद्रा शिवाजिमाहराजंच्या बालपणापासूनच वापरण्यात येऊ लागली. महाराजांच्या उपलब्ध झालेल्या दिनांक २४ सप्टेंबर १६३९ च्या पत्रावर ही मुद्रा प्रथम आढळते. या वेळी महाराज नऊ वर्षाचे होते. नंतर महाराजांच्या अखेरपर्येंत हीच मुद्रा वापरण्यात आली. राजपत्रांवर, आज्ञापत्रांवर आणि तहकरनाम्यांवर हीच मुद्रा आढळते. राज्याभिषेकाच्या वेळी एक नवीन राजमुद्रा करण्यातआलि होती. पण ती मुद्रा कधिहि वापरली गेली नाही. सदैव यशस्वी ठरलेली 'प्रतिपच्चंद्र' मुद्राच महाराजांनी अधिकृत 'राजमुद्रा' म्हणून वापरली.
#मर्यादेयं #विराजते :-
' मर्यादेयं विराजते' ही लेखनसमाप्तिची मुद्रा महाराजांनी व नंतरच्या सर्व छत्रपतींनी वापरली. या दोन्ही मुद्रांना बादशाही राज्यव्यवहारात अनुक्रमे 'शिक्का' आणि 'मोर्तब' असे म्हणत असत. ही शिक्का मोर्तब फार्सी भाषेत असत. छत्रपतिंच्या मुद्रा संस्कृत भाषेत होत्या. परराज्य व स्वराज्य याचे स्पष्ट दर्शन यांत होत होते.

No comments:

Post a Comment