Total Pageviews

Wednesday, 9 September 2015

शिवाजी‬ ‪‎महाराजांची‬ ‪‎राजचिन्हे‬ :भवानी‬ ‪तलवार



‪#‎भवानी‬ ‪#‎तलवार‬ :-
' भवानी तलवार' ही महाराज शिवछत्रपतीची खास तलवार (म्हणजे राजशस्त्र) होती. ही तलवार महाराजांना इ. १६५८ मधे कोकणात कुडाळ येथे गोवालेकर सावंत नांवाच्य माणसाकडून मिळाली. महाराजांनी या सावंताना प्रतीभेट म्हणून तीनशे होन व मानाचि वस्त्रे दिली. अफजलस्वारीच्या काळांत एका रात्री महाराजांना आपली कुलदेवता श्रीभवनी स्वप्नात दर्शन देऊन म्हणाली की, 'मी तुझी तलवारच होऊन राहिले आहे.' या वेळी स्वप्नात श्रीभवानीदेवी विजेच्या लोळाप्रमाणे या तलवारीत प्रविष्ट झालेली महाराजांना दिसली. हा दिव्य शकून व प्रसाद मानून महाराजांनी या तलवारीस 'भवानी' असे नाव दिले. ती सदैव यशस्वी ठरली.
ही तलवार सध्या कुठे आहे या विषयी अनंत उलटसुलट मतमतांतरे आहेत.

No comments:

Post a Comment