Total Pageviews

Wednesday, 9 September 2015

‎शिवाजी‬ ‪‎महाराजांची‬ ‪‎राजचिन्हे‬: ‎श्रीशिवलिंग



‪#‎श्रीशिवलिंग‬ :-
छत्रपति शिवाजी महाराजांच्या नित्य पुजेचे एक सुंदर शिवलिंग होते. यालाच ‪#‎बाण‬ असेहि म्हणत. हा बाण सध्या सातारा येथे छत्रपति महाराजांच्या पुजेत आहे. याचा रंग सावळा आहे. याची उंची सुमारे साडे पाच इंच आहे.
शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर हा बाण रायगडावर देवघरात असावा. छत्रपति संभाजी महाराजांनंतर छत्रपति राजाराम महाराजांबरोबर जिंजीच्या किल्ल्यात राजघराणे सात वर्षे होते. हा बाणही त्यांच्याबरोबर तेथे राहणे स्वाभाविक होते. जिंजीच्या वेढ्यातून राजाराम छत्रपति इ. १६९८ मधे सुटुन महाराष्ट्रात आले. त्यांच्या समवेत हा शिव-बाण महाराष्ट्रात आला.
पुढे दोनच वर्षांनी दि. ३ मार्च १७०० या दिवशी राजाराम छत्रपति सिंहगडावर मृत्यू पावले. त्या वेळेपासून हा बाण सिंहगडावर होता. राजाराम महाराजांच्या समाधिमंदिरात समाधीवर हा बाण ठेवण्यात येत असे. याची पूजाअर्चा साताऱ्याच्या छत्रपति महाराजांकडून होत असे. इ. १९७६ मधे या बाणाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने छत्रपति पुण्यशील राजमाता सुमित्राराजे महाराजसाहेब यांनी हा बाण सिंहगडावरून साताऱ्यास राजवाडयातील देवघरात आणून ठेवला. प्रत्यक्ष शककर्ते छत्रपति शिवाजी महाराजांच्या नित्य पुजेतील दैवत म्हणून या बाणाचे ऐतिहासिक महत्व अनन्य साधारण आहे.
http://itihasbynikhilaghade.blogspot.com

No comments:

Post a Comment