!!...............सुरत लूट............!! भाग- २
मंगळवार ५ जाने १६६४ – दिवस उजाडताच कोणीतरी अनोळखी सरदार ८ ते १० हजार सैन्यासह घणदेवीला आल्याची वार्ता सर्वत्र पसरली. सकाळी ९ च्या सुमारास इनायतखान यास शिवाजी महाराज सुरतेस आल्याची बातमी समजली. अगोदर शिवाजी महाराज इकडे येऊ शकतो यावर कुणाचा विश्वास बसेना, त्यातच शिवाजी महाराज सगळीकडे सांगत होते की आपण बादशाही सरदार आहोत अहमदाबादकडे जात आहोत, पण हळू हळू सगळ्यांनाच विश्वास बसला की शिवाजी महाराज नावाचा कर्दनकाळ सुरतेच्या दिशेने येत आहे आणि सुरतेमधे पळापळ सुरु झाली (प.सा.सं- ले- ९६८).
बुधवार ६ जाने १६६४ – महाराज आता घणदेवीहून निघाले आणि सुरतेच्या औडेना (उधना ?) या गावी पोचले इथे देखील महाराज आपण आपण बादशाही सरदार आहोत असेच सांगत आपण महाबतखानाच्या बोलावण्यावरून पट्टणचे बंड मोडण्यासाठी जात आहोत अशी बतावणी करत होते. महाराज आता सुरतेच्या अगदी जवळ येऊन पोचले. महाराज बादशाही सरदार म्हणवून घेत असल्यामुळे इनायतखानाने महाराजांकडे हस्तक पाठवला आणि त्यासोबत निरोप पाठवला की – ” येथील लोक भितीने पळून जाऊ लागले आहेत तरी तुम्ही अधिक जवळ येऊ नये ” हा असा निरोप आल्यावर महाराजांनी निरोप आणणाऱ्यास चिडून कैद केले. दरम्यान डचांनी देखील त्यांची २ माणसे माहिती काढण्याकरिता पाठवली त्यांनासुधा महाराजांनी कैद केले आणि नंतर संध्याकळी सोडून दिले. डच तसे हुशार सकाळी ७ वाजल्यापासूनच त्यांनी त्यांच्या वखारीचा बंदोबस्त करून ठेवला होता. त्यांचा काही माल बाहेर विणकरी आणि रंगारी यांच्याकडे होता तो त्यांनी वखारीत आणून टाकला. इनायतखान १००० घोडदळ घेऊन किल्ल्याकडे गेला आणि घोडे त्याने तोफांच्या संरक्षणाखाली उभे केले. याचवेळी सकाळी १० वाजता किल्ल्याजवळून इंग्रज प्रेसिडेंट ने २०० इंग्रज व इतर शिपाई यांची मिरवणूक काढली (प.सा.सं-ले- ९६८). एवढ्यात महाराज हे सुरतेच्या आत आले आणि लगेच महाराजांनी निरोप पाठवला हाजी सैद बेग, वीरजी व्होरा, हाजी कासम या तीन व्यापाऱ्यांनी जातीने आपल्यासमोर येऊन खंडणीचा ठराव करावा नाही तर आपण शहरावर आग व तलवार चालवू, सुभेदाराने महाराजांच्या या मागणीला उत्तर दिले नाही. आता महाराजांचा संयम सुटला आणि महाराजांनी हुकुम सोडला. क्षणाधार्त शहरात अग्निप्रलय आणि लुटालूट सुरु झाली (प.सा.सं- ले- ९७५) डचांनी आपल्या वखारी बंद केल्या, त्यांना शहराच्या मध्यभागी ज्वाळा निघालेल्या दिसल्या महाराजांचे सर्व घोडेस्वार आता टोळ्यांनी फिरू लागले, शहरात बेफाम लुटालूट सुरु होती. लुट करताना कुणाकडूनही प्रतिकार होत नाही हे समजताच मराठे लगेच सुरतेच्या किल्ल्याला भिडले, इनायतखानाचे लोक प्रतिकार म्हणून तोफा चालवत होते पण त्यामुळे शहरातील घरांनाच धोका पोहचत होता, किल्ल्यालाच लागुन जकातघर होते मराठ्यांनी ते मनमुराद लुटले (प.सा.सं- ले- ९७५) यामधेच स्वालीचा अँथोनी स्मिथ नावाचा इंग्रज डचांच्या वखारीकडून परतत असताना मराठ्यांनी त्याला कैद केले आणि महाराजांसमोर हजर केले महाराज त्याला म्हणाले ” औरंगजेबाने आमच्या मुलखावर स्वाऱ्या करून आपल्या नातेवाईकास ठार मारले त्याबद्दल त्याचा सूड उगवायचा आहे, जर इंग्रज आणि डच यांनी काही द्रव्य दिले तर आपण त्यांना त्रास देणार नाही, जर असे झाले नाही तर शक्य तेवढा त्रास देईन ” पुढे स्मिथने परत जाण्याची परवानगी मागितली ती त्याला न देता त्याला बांधून ठेवण्यात आले (प.सा.सं- ले- ९७७)
१६४६ पूर्वी डचांची असणारी ही वखार इंग्रजांनी जिंकून पुढे स्वतः वापरली.
गुरुवार ७ जाने १९६४ – सुरतेमधे निकोलस कोलेस्ट्रा या नावाचा एक ग्रीक व्यापारी होता, त्यासोबत महाराजांनी एक घोडेस्वार देऊन डच यांच्यासोबत बोलणे करण्याकरिता पाठवले. तो वखारीत पोचल्यावर महाराजांचा निरोप सांगू लागला, तुम्हाला व इंग्रजांना सांगण्याकरिता पाठवले आहे की औरंगजेबाचा धाकटा भाऊ शाहसुजा आता शिवाजी बरोबर राहत असून त्याने शिवाजीला सुरात शहर दिले आहे. शिवाजीला सैन्याकरिता काही रक्कम हवी आहे त्याची सोय करावी जर ती नाही झाली तर सर्व शहर जाळून भस्मसात करण्यात येईल. शाहसुजा हा ३ वर्षापूर्वीच अर्कान इथे वारला होता हे सर्वांनाच माहिती होते त्यमुळे हा फक्त बहाणा होता हे सर्व जाणून होते. यावर डच डायरेक्टरने निरोप पाठवला की आम्ही व्यापारी लोक आपला पैसा जवळ ठेवत नाही.आपल्याला चालत असेल तर काही कापड आणि मसाल्याचे पदार्थ पाठवू, वेंगुर्ल्यास जसे तुम्ही त्रास न देता अद्याप पर्यंत संबध चालवले आहेत तसे इथे देखील चालवावे (प.सा.सं- ले- ९६७).
या सर्व घटना घडत असताना महाराजांच्या छावणीत एक विलक्षण प्रकार घडला, सुरतेचा सुभेदार इनायत खान याने एका तरुण माणसाला वकील म्हणून तडजोडीची बोलणी करण्याकरिता पाठवले, त्याने महाराजांची भेट घेऊन इनायतखानाच्या सर्व शर्ती मांडल्या यावर महाराजांनी उत्तर दिले – ‘ह्या अटी मान्य करायला आम्ही बायका आहोत असा सुभेदाराचा सम
या सर्व घटना घडत असताना महाराजांच्या छावणीत एक विलक्षण प्रकार घडला, सुरतेचा सुभेदार इनायत खान याने एका तरुण माणसाला वकील म्हणून तडजोडीची बोलणी करण्याकरिता पाठवले, त्याने महाराजांची भेट घेऊन इनायतखानाच्या सर्व शर्ती मांडल्या यावर महाराजांनी उत्तर दिले – ‘ह्या अटी मान्य करायला आम्ही बायका आहोत असा सुभेदाराचा सम
http://itihasbynikhilaghade.blogspot.com
No comments:
Post a Comment