Total Pageviews

Wednesday, 9 September 2015

शिवछत्रपतींचे आरमार

युध्द नौका बांधण्याचा कामावर शिवाजी महाराजांनी पोर्तुगीज व टोपँझ कारागीर ठेवले होते. त्यांनी शिवरायांकडील नोकरी सोडून यावे याकरीता त्यांचे मन वळविण्याची कामकिरी वसईचा पोर्तुगीज कँप्टन आंतोनियु द मेलु द काश्त्रु याने जुआंव द सालाझार द व्हाश्कोंसेलुश याच्यावर सोपविली. त्याने ती यथास्थीत पार पाडली. त्याबद्दल आंतोनियु द मेलु द काश्त्रु याने ३० सप्टेंबर १६५९(नवि पध्दत) या तारखेचे जे प्रमाणपत्र ते पुढील प्रमाणे आहे :
मी वसई किल्ला व शहर आणि त्याच्या अधिकारकक्षेतील अशेरी, मनोर, वगैरे मुलूख यांचा कँप्टन, आंतोनियु द मेलु काश्त्रु प्रमाणपत्र देतो की :
सध्या कोकणातील भिवंडीच्या व कल्यणच्या प्रदेशाचा खाडीपर्यंतचा ताबा शिवाजी राजाकडे आहे. तो भिवंडी, कल्याण व पेण येथे वीस संग्विसेली, यांच्या सहाय्याने दंड्याचा सिद्दीला वेढा घालावयाचा आहे अशा सबबीवर, सज्ज करीत होता. अशी गोष्ट राज्यात कधी पाहीलेली नाही आणि [पोर्तुगालच्या] राजाच्या शस्त्रबळास कमीपणा आणणारी आहे. कारण आमच्या नद्यांच्या व खांड्यांच्या मार्गाखेरीज अन्य मार्गाने ते आरमार बाहेर पडू शकत नाही. त्या आरमाराच्या सहाय्याने साष्टी बेटावरील गावांची मोठी हानी करण्याचे सामर्थ त्या झेंतीऊला[म्हणजे हिंदूला, शिवाजी महाराज] प्राप्त झाले असते, पकडलेल्या नौकांचा वापर करून त्याने मोठी आरमारे सज्ज केली असती आणि तो जमिनीवर जेवढा बलाढ्य व भाग्यशाली [म्हणजे यशस्वी] आहे तसा समुद्रावर बलाढ्य झाला असता.
रूय लैतांव व्हियेगश आणि त्याचा मुलगा फेर्नाव व्हियेगश यांच्या पात्रतेवर विसंबून शिवाजी या संग्वेसेली सज्ज करीत होता. त्या आरमाराची व्यवस्था, आणि त्यांच्या टोळीत जे तीनशे पोर्तुगीज व टोपँझ काम करीत होते त्यांची जबाबदारी, शिवाजीने त्यांच्यावर सोपविली होती.
ते आरमार रूय लैतांव, त्याचा मुलगा आणि रूय लैतांवबरोबर काम करणारे पोर्तुगीज व टोपँझ यांच्या मदतीवर अवलंबून होते. त्या आरमाराचा संचार पुर्णपणे बंद पाडावा म्हणून रूय लैताव याने त्या झेंतीऊला सोडून देऊन, स्वत: च्या टोळीतील व इतर सर्व ख्रिस्थी लोकांसह, या शहरास यावे.........
संदर्भ : शिवछत्रपतींचे आरमार

No comments:

Post a Comment