Total Pageviews

Wednesday, 9 September 2015

दुर्ग सज्ञा



१ - दुर्ग म्हणजे किल्ला असे जाणावे. पर्वतावरील किल्ल्याला गड असे म्हणतात. किल्ल्याच्या भिंतींना कोट म्हणतात. समुद्रात घुसलेला भूभाग ( तिन्ही बाजूनी पाणी ) म्हणजे द्वीप याला जंजीरा म्हणतात.
२ - डोंगराचा कडा म्हणजे भृगु आणि भृगुपात म्हणजे कडेलोट ( कड्यावरुन ढकलून देण्याची शिक्षा ) दन्तक म्हणजे गडकोन ( डोंगर उतारावर डोकावणार्या शिळा ) बुरुज म्हणजे किल्ल्याच्या गोल भिंती ( कोट्टगुल्मकम )
३ - डोंगराचा पुढे आलेला निमुळता भाग म्हणजे माची. किल्ल्याचा प्रमुख भाग, जेथे कामकाज चालते त्यास बालेकिल्ला म्हणतात. पहाड़ी किल्ल्याच्या उंच सपाटीवरील पोट किल्ला. तटाच्या पृष्ठ भाग म्हणजे फांजी परिखा म्हणजे खंदक.
४ - मुख्य दारावरील खंदका पलीकडील संरक्षण बुरुज म्हणजे रेवणी. तटाचे वळण म्हणजे पडकोट असे म्हणतात.
५ - किल्ल्याच्या तटाला तोफांच्या मार्यासाठी ठेवलेली भोके म्हणजे जंग्या. तटाच्या फळ्यांना चर्या म्हणतात. किल्ल्याच्या प्रवेश द्वारापुढे बांधलेल्या भिंतीला जीभी म्हणजेच हस्तिनखा म्हणतात. या भिंतीमुळे शत्रूला प्रवेश करने अवघड होत असे. दरवाज्याच्या अडसराला अगळा / अर्गला म्हणतात.
६ - परिधी म्हणजे किल्ल्याला दिलेला ( सैन्याचा ) वेढा. शत्रूच्या जवळ जाणे, शत्रूच्या दिशेने कूच करणे, चालून जाणे म्हणजे मोर्चा. अलंग म्हणजे संरक्षण भिंत आणि मेट म्हणजे पहारा / गस्त.
७ - सर्व सैन्याने शत्रुवर निकाराचा हल्ला चढवणे ( साहसाधिरोह: ) ( एल्गार ) याला सुलतान ढवा असे म्हणतात. मगर्बिवी ( मग्रबी ) म्हणजे दगड फेकून मारण्याचे यंत्र असे जाणकार म्हणतात.
८ - धमधमा म्हणजे प्रतिगुल्म ( तोफा चढविण्याचा उंचवटा ) सुरंग म्हणजे विवर. किल्ल्याच्या तटाला पाडलेले भगदाड घभूयार. यमाटन म्हणजे गस्त यालाच यामिक असे म्हणतात. रात्रीच्या वेळी किल्ल्याच्या संरक्षणासाठी ठेवलेला पहारा.
९ - घाटगस्ती तसेच घंटायामिक म्हणजे घाट रस्त्यावरुन ठेवलेला पहारा. सामग्री म्हणजे सामान, उपयोगी वस्तु जकीरा म्हणजे त्यांचा संग्रह - कोठार.
१० - अंबरखाना म्हणजे किल्ल्यावरील धान्यकोठार. गल्ला म्हणजे त्यातील धान्य असे म्हणतले जाते. कारखान्याला संभारगृह ( उपयुक्त सामग्रीचे कोठार ) असे म्हटले आहे.
११ - कोठारातील सामुग्रीच्या हिशेब लिहिणार्या अधिकार्यास कारखानीस म्हणतले जाते. येथील मुद्राधिकार्यास हवालदार - किल्लेदार म्हटले आहे.
१२ - प्राकरपाल ( तटरक्षक ) हा तटसरनौबत ( किल्ल्यावरील सैन्याचा प्रमुख असतो ) इमारती हवालदार हा बांधकामावरील अधिकारी होय.
१३ - गौंडा म्हणजे भिंत बांधणारा कारगीर ( गवंडी ) आणि पलगंड म्हणजे बेलदार-दगड तासणारा ( पाथरवट ) इमारतीच्या बांधकामातील भिंतीवर घावयाचा लेप ( चुन्याचा ) म्हणजे गिलावा.
१४ - संगत्रास म्हणजे बांधकामाचे दगड तासणारा. ( अश्मभेत्ता ) खंबीर बांधकामासाठी वापरण्याचा घाणीत मळलेला चूना. चूर्ण कर्दम. दगड वाहून नेणारा सेवक म्हणजे गडेकरी.
१५ - कौल म्हणजे भाजलेल्या मातीच्या खापर्या ( कर्परा ) ( घराच्या छपरांवर शाकारण्याच्या ) चिरे म्हणजे घडवलेले दगड.
१६ - दिवाणवाडा म्हणजे राजाचे किल्ल्यावरील घर. सदर म्हणजे किल्ल्यावरील राजसभा. राजपुत्राचे किंवा दासीपुत्राचे निवासस्थान म्हणजे खानजादेवाडा.
१७ - गुसुलखाना म्हणजे मन्त्रस्थान - गुप्त सल्लामसलत करण्याचे स्थान. चतुष्क - चौसोपी घराच्या मधले अंगण किंवा चौकोनी तलावास चतुष्क किंवा चौक म्हणतात. हरमहाल किंवा शुध्दान्त म्हणजे अंत:पुर ( राण्या राहण्याचा महाल ) कक्ष्या म्हणजे ( बंक ) ओसरी.
१८ - देहली म्हणजे देव्हडी - देवडी. तोरण म्हणजे किल्ल्याचा मुख्य दरवाजा. गवाक्षे म्हणजे ढरोके.
१९ - चन्द्रशाला म्हणजे सज्जा. ( माडीचा पुढे आलेला भाग - गॅलरी ) आणि सोपान म्हणजे पायरी किंवा जिना. बालंगरेज म्हणजे - वळचण.
[ श्री शिवछत्रपती राज्यव्यवहार कोशातील सातवा दुर्गवर्ग. किल्ल्यांच्या संदर्भतील शब्दांची यादी संपली]
http://itihasbynikhilaghade.blogspot.com

No comments:

Post a Comment