Total Pageviews

Monday, 1 February 2016

कट्यार

★ कट्यार ★

कट्यार हे मध्ययुगीन भारतीय उपखंडात प्रचलित असलेले
पात्याचे शस्त्र होय. हिला ‘एच’ या रोमन
अक्षराच्या (रोमन: H) आकारातली मूठ असते; जेणेकरून
शस्त्रधारकाच्या मूठ आवळलेल्या बोटांवरून हिचे पाते
सरळ फुटल्यासारखे दिसते. हिच्या संरचनेमुळे
लक्ष्याला भोसकण्यासाठी हिचा वार करता येतो.
समारंभप्रसंगी गौरवचिन्ह म्हणूनही हिला महत्त्वाचे
स्थान आहे. सध्याच्या काळात विवाह सोहळ्यात
हिचा वापर केला जातो. उत्तर भारतात जसे
मोजड्या पळवतात तसे महाराष्ट्रात वधुचे भाऊ
कट्यार पळवतात आणि त्या बदल्यात वराकडून पैसे
वसूल करतात.

प्रकार – बिचवा, खान्ज्राली, खंजीर, पेशकब्ज,
किंदजल, कुकरी, जंबिया, कर्द
यातील बहुतांश हत्यारे हि शेल्यात ठेवता येत
असत.जवळ आलेल्या शत्रूस गारद करण्यास वा
हातघाईच्या लढाईत याचा वापर विशेष होत असे
बर्याचदा तुटलेल्या तलवारींची पाती हीच या
कट्यारी बनविण्यास वापरात असत त्यामुळे कट्यारी
चे आकार छोटे मोठे असत .
किद्जल, खान्ज्राली हेप्रकार तुर्की आहेत तर खंजीर,
पेशकब्ज, जंबिया प्रकार हे मोगली आहेत.
बिचवा हे मराठा शस्त्र असून दुधारी आणि कमी
लांबीचे पाते हे त्याचे खास वैशिष्ठ्य.

अफझलखानाचा कोथळा शिवाजी महाराजांनी
बिचवा हे लहान शस्त्र वापरूनच काढला असे अनेक
इतिहासकार सांगतात.
१) मराठा कट्यार: १० ते २० इंच लांबीची अखंड ओतीव
असते, तिचा अर्धाभाग पकडण्यासाठी असून हाताचे
संरक्षण करण्यासाठी दोन उभ्या पट्ट्या असतात.
२) मुघल कट्यार: पाते, नख्या, मूठ असे कट्यारीचे तीन
भाग रिबेटने जोडलेले असतात पाते बहुतांश:तलवारीचेच
वापरतात नख्या व मूठ यांच्यावर नक्षीकाम केलेले
असते.
३) हैद्राबादी कट्यार: याचे पाते लांब व रुंद असते ते
पातळ पत्र्याचे बनविलेले असते. या कट्यारीत हाताचे
संरक्षण करण्यासाठी मूठीवर संरक्षण कवच असते,
त्यामुळे मनगटापर्यंत हाताचे संरक्षण होते. हैद्राबादी
कट्यारी १५ इंचापासून २५ इंचापर्यंत लांब असतात.
४) मानकरी कट्यार: शोभिवंत, मजबूत, जाडजूड व
सोन्या चांदीचे नक्षीकाम केलेली असते.
५) सैनिकांची कट्यार: साधी पण मजबूत असते.
६) स्त्रिया व मुले यांची कट्यार: स्त्रिया व
मुलांसाठी लहान आकाराच्या, कमी वजनाच्या
शोभिवंत कट्यारी बनवल्या जात.

कट्यारीचे इतर प्रकारही आहेत जसे, जंबीया, खंजीर,
खंजराली, पेशकबज इत्यादी.

⛳🙏🏻जय भवानी, जय शिवराय🙏🏻⛳

No comments:

Post a Comment