Total Pageviews

Saturday, 19 December 2015

तुळाजी निमगोरा

एका इंग्रज व्यापार्यानें तुळाजीचें वर्णन पुढीलप्रमाणें केलें
आहे. ''तुळाजी निमगोरा, उंच, भव्य देखणा व अत्यंत
रुबाबदार होता. त्याला पाहिल्याबरोबर मूर्तिमंत
शौर्याची कल्पना मनांत येई. त्याची कृती ही रुपास
साजेशीच होती. कोणतेही जहाज त्याच्या तावडीत
सापडलें म्हणजे ते सहसां सुटून जात नसे. इंग्रज व्यापारी
त्याच्या त्रासास इतके कंटाळलें कीं, ''देवा कसेंहि करुन
याला आमच्या तावडींत आणून दे,'' अशी परमेश्वराची ते
करुणा भाकूं लागले. तुळाजीची शक्ति व तयारी परिपूर्ण
होती. त्याची बंदरें भरभराठींत असून रयत सुखी होती.
तीस हजार फौज त्याजपाशीं जय्यत होती.
तोफखान्यावर अनेक कुशल यूरोपीय लोक लष्करी व
आरमारी कामें झटून करीत होते. त्याच्या आरमारांत
साठांवर जहाजें असून शिवाय हत्ती, दारुगोळा व
शस्त्रास्त्रें असंख्य होतीं.

------------------------------

आंग्रे घराण्याची वंशावळ खाली दिल्याप्रमाणे...➡

सेखोजी

तुकोजी

१ कान्होजी

।-----------।--------------।------------
२ सेखोजी         ३ संभाजी  ४ मानाजी  ५
तुळाजी येसजी
(वजारत-म्-आब) ।
। ८
बाबुराव
६ रघोजी

७ मानाजी, दुसरा

९ रघोजी, दुसरा

१० कान्होजी, दुसरा
http://shivkalinitihasbynikhilaghade.blogspot.com
------------------------------

No comments:

Post a Comment