सरसेनापती हंबीरराव मोहिते –
भाग ३
भाग ३
व्यंकोजीराजांवर विजय
कर्नाटक मोहिमेवर असताना महाराजांनी व्यंकोजीराजाकडे कर्नाटकातील शहाजीराजांच्या जहागीराचा अर्धा वाटा मागितला पण वाटा न देताच त्यांनी हंबीररावांच्या सैन्यावर आक्रमण केले . व्यंकोजीराजांकडे ४००० घोडदल व १०००० पायदळ होते.तर हंबीररावांच्या कडे ६००० घोडदल व ६००० पायदळ होते . दोन्ही सैन्यात जोरदार लढाई होऊन हंबीररावांच्या सेनेचा पराभव झाला . विजय मिळाल्यामुळे व्यंकोजीराजे व त्यांचे सैन्य आराम करू लागले . याप्रसंगी हंबीररावांनी व संताजी भोसले यांनी मराठी सैन्यास एकत्र करून मध्यरात्रीच व्यंकोजीराजांच्या तालावर हल्ला करून त्यांच्या फौजेची दणादण उडविली . प्रचंड असा खजिना,हत्ती,घोडे मराठ्यांच्या हाती लागले . व्यंकोजीराजे सुद्धा हाती लागले होते , पण महाराजांच्या बंधूस कैद कसे करावे असा विचार करून त्यांनी व्यंकोजीराजांस सोडून दिले . हे युद्ध १६ नोव्हेंबर ,१६७७ साली झाले. यानंतर हंबीररावांनी कर्नाटकातील असा वेलोरचा बुलंद कोट काबीज केला. (२२ जुलै, १६७८)
http://itihasbynikhilaghade.blogspot.com
No comments:
Post a Comment