Total Pageviews

Thursday, 3 September 2015

कवीराज भुषण

कवीराज भुषण यांच्या बद्दल

कवि भूषण यांचा जन्म १६१६ साली कानपूर जिल्ह्यातील तिकमपूर नावाच्या गावी झाला. त्यांचे वडिल रत्नाकर पंडीत हे एक नामांकित विद्वान पुरूष म्हणून विख्यात होते.
यांना १) चिंतामणी २) भूषण ३) मतिराम ४) नीलकण्ठ असे चार मुले होती. ही चारही मुले विद्वान म्हणून पुढे प्रसिद्धीस आली.
थोरले चिंतामणी पंडीत उत्तरेत आपल्या कवित्व गुणांनी फार सुविख्यात झाले.
भूषण हे बरेच दिवस आपले थोरले बंधू चिंतामणी यांच्या जवळ राहात असत. पण एक दिवस भावजयीच्या काही दुरूत्तरांमुळे रागावून ते घराबाहेर पडले व त्यांनी स्वतंत्रपणे आपल्या विद्वत्तेच्या व कवित्वाच्या जोरावर स्वतःचा उत्कर्ष करून घेतला.
चित्रकूट राजा ऋदयराम सोळंकी यांच्याकडे कविराज गेले असताना, राजाच्या गर्वीष्ठ दानदर्पास झुगारून त्यांनी स्वतःच्या कवितेचे व अस्मितेचे जतन आणि संरक्षण केले. शिवरायांचा चरित्रचंद्र पाहून प्रभावित झालेले कविराज उत्तरेहून दक्षिणेकडील सह्याद्रीचे काटे सराटे तुडवीत येऊन महाराजांना भेटले. त्यांनी शिवराजभूषण नावाचा एक अलंकार शास्त्रावरील ग्रंथ लिहिलेला असून त्यात शिवरायांच्या निरनिराळ्या पराक्रमांचे काव्यमय वर्णन अलंकारीक पद्धतीने अविश्कारीत केलेले आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांची आणि कवींची भेट रायगडावर झाली. ते कवी आहे हे त्यांना समजले आणि त्यांनी म्हटलं,
आपण कवी आहात? मला आपलं एखादं काव्य ऐकता येईल का?
कवी भुषणांनी चटकन म्हटलं.. हे राजन,
इंद जिमि जृंभपर। बाढब सअंबपर ।।
रावण सदंभपर। रघुकुलराज है ।।
पवन बारिबाहपर। संभू रतिनाहपर ।।
जो सहसबाहपर। रामद्विजराज है ।।
दावा दुमदंडपर। चीता मृग झंडपर ।।
भूषण वितुंडपर। जैसे मृगराज है ।।
तेज तम अंशपर। कन्नजिमि कंसपर ।।
जो म्लेंछ वंशपर। शेर शिवराज है ।।
शेर शिवराज है।।
मराठी अर्थ:
इंद्र जसा जंभासुरावर,
जमीनीवरचे वादळ जसे आकाशावर,
रावणाच्या लंकेवर जसा रघुकुळाचा राजा प्रभूरामचंद्र चालून गेले होते,
वारा जसा पाण्याने भरलेल्या ढगांवर,
शंकर जसा रतीचा पती मदनावर,
सहत्र क्षत्रियांवर जसा परशुराम चालून गेले होते,
आकाशातली विज जशी लाकडी बुंध्यावर,
चित्ता जसा हरणांच्या कळपावर,
सिंह(मृगराज) जसा हत्तीवर,
प्रकाषाचा किरण जसा अंधार कापतो,
कृष्ण जसा कंसावर,
तसेच शेर शिवराज म्लेंच्छ वंशावर चाल करून गेले आहेत.
http://itihasbynikhilaghade.blogspot.com 

No comments:

Post a Comment