सरखेल कान्होजी आंग्रे ( मराठ्यांचे नौदल प्रमुख )
भाग ६
मृत्यू
४ जुलै १७२९ मध्ये कान्होजी आंग्रेंचा मृत्यू झाला. त्यावेळी सुरतपासून दक्षिणेकडे गोव्यापर्यंत त्यांचे अनिर्बंध वर्चस्व होते. त्यांचे दोन पुत्र शेखोजी आणि संभाजी आणि तीन अनौरस पुत्र तुळाजी, मानाजी आणि येशाजी ह्यांच्याकडे त्यांच्या आरमाराची जबाबदारी आली, पण त्यांना कान्होजींची सर आली नाही. कान्होजी नंतर शेखोजीने १७३३ म्हणजे त्याच्या मृत्यूपर्यंत काही प्रमाणात आरमाराची धुरा सांभाळत पराक्रम गाजवला. शेखोजीच्या मृत्यूनंतर संभाजी आणि मानाजी या बंधूंत वाद होऊन आरमाराचे दोघांत विभाजन झाले. पुढच्या काळात या सागरी शक्तीकडे मराठ्यांचे दुर्लक्ष झाले आणि ब्रिटिशांनी संधी साधून हळूहळू आपले पाय कोकण किनारी पसरवण्यास सुरूवात केली. १७५६ मध्ये ब्रिटिशांनी पेशव्यांच्या मदतीने घेरियावर (आताचा विजयदुर्ग) हल्ला करून कान्होजींचा शेवटचा वंशज तुळाजीला पकडले, आणि कान्होजींचे आरमार संपुष्टात आणले.
http://itihasbynikhilaghade.blogspot.com
No comments:
Post a Comment