Total Pageviews

Tuesday, 1 September 2015

सरखेल कान्होजी आंग्रे ( मराठ्यांचे नौदल प्रमुख ) भाग ७

सरखेल कान्होजी आंग्रे ( मराठ्यांचे नौदल प्रमुख )
भाग ७
वारसा

कान्होजींच्या काळात त्यांनी विदेशी सत्तांना सागरी किनाऱ्यावर मोठे आव्हान निर्माण केले होते. ब्रिटिश आणि पोर्तुगीज आरमाराचे त्यांत प्रचंड नुकसान झाले. भारतातील त्यांच्या वाढत्या वर्चस्वावर अंकुश लावग. दुर्दैवाने कान्होजींच्या मृत्यूंनंतर त्यांच्याएवढा शूर आणि यशस्वी दर्यावर्दी भारतात निर्माण झाला नाही आणि ब्रिटिशांनी हळूहळू पूर्ण भारताचा कब्जा घेतला
वाढत्या परकीय आक्रमणाला तोंड देण्यासाठी भारताच्या सागरी सीमेचे रक्षण करणे किती महत्त्वाचे आहे हे कान्होजी त्या काळीच ओळखून होते.
त्यांच्या सागरी साम्राज्याच्या उत्कर्षाला त्यांच्याकडे ब्रिटिशांहून संख्येने अधिक आणि बलाढ्य आरमार होते. त्यांच्याशी टक्कर घेण्याची कोणाची हिम्मत नव्हती. आपल्या आरमारात काही विदेशी सरदारांनाही त्यांनी बाळगले होते.

अलिबाग शहरात कान्होजी आंग्रेंची समाधी आहे. मुंबईच्या नेव्हल डॉकयार्डमध्ये त्यांचा पुतळा उभा आहे. एकेकाळी जिथे एक ब्रिटिश किल्ला होता तिथे आता भारतीय आरमाराचा वेस्टर्न नेव्हल कमांडचा तळ आहे. या तळाला कान्होजी आंग्रेंच्या गौरवाप्रीत्यर्थ आय एन एस आंग्रे असे नामकरण केले गेले आहे.
http://itihasbynikhilaghade.blogspot.com

No comments:

Post a Comment