Total Pageviews

Thursday, 10 September 2015

शिवाजी महाराजांची राजचिन्हे: भगवा ध्वज



शिवाजी महाराजांची राजचिन्हे।।
भगवा ध्वज :-
स्वराज्याचा अधिकृत ध्वज म्हणून शिवाजी महाराजांनी भगवा झेंडा अगदी प्रारंभापसून वापरला. भगवा ध्वज हाच भारताचा व महाराष्ट्राचा धर्मध्वज आहे. हाच ध्वज भारतीय संस्कृतिचा व तत्वज्ञानाचा प्रतीक आहे. या ध्वजाची परंपरा प्राचीन आहे. अरुणध्वज म्हणजे भगवा ध्वज. वारकऱ्याचा झेंडा भगवाच. महाराज आग्र्याला गेले तेव्हाही त्यांच्या स्वारीच्या आघाडीवर भगवा झेंडा हत्तीवर फडकत होता. प्रत्येक किल्ल्यावर भगवा झेंडा लावला जात असे. मराठी आरमारावरही भगवे झेंडे फडकत असत.
http://itihasbynikhilaghadeblogspot.com

No comments:

Post a Comment