Total Pageviews

Monday, 7 September 2015

जयोस्तू महाराष्ट्राची यशोगाथा



हि कथा आहे शिवशाहीच्या स्थापनेच्या सुरवातीच्या काळातली...
.
बाल शिवबाराजांनी नुकतीच स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली होती..आई साहेबानी पुणे परत चांगल्या रीतीने वसवले होते..
रायगडा जवळ कोंडावळे गावात आईसाहेबांच्या एका नातलगाचे लग्न होते.. त्यामुळे आईसाहेब शिवबाराजांना घेऊन त्या लग्नाला गेलेल्या होत्या..
रात्री लग्नाची वरात निघाली होती.राजे स्वत; एकटेच काही अंगरक्षकांना घेऊन ते पाहायला गेले होते..
वराती समोर झांज पथक ,लेझीम वाले खेळ करून दाखवत होते..
पण एक दांडपट्टेबाज बहाद्दर असा काही पट्टा फिरवत होता जणू सुदर्शन फिरवावे असे..
चारी बाजूनी लोक त्याचावर लिंबू फेकत होते ..पण त्या लीम्बुचे तुकडे होऊन पडत होते ...
चांगला दीड दोन तास झाला तरी हा बहाद्दर हसत हसत पट्टा फिरवत होता.....
बाल राजांच्या घारी नजरेतून हा हिरा कसा निसटेल?
...राजांनी तान्हाजीला सांगितले ..तान्हा ..बोलाव त्या पट्टेबाजाला..
क्षणात तान्हाजी त्याला घेऊन आले ..
राजे बोलले ...काय नाव तुमचे धारकरी ? गाव कोणते ? करता काय ?
म्या जिवाजी महाले .... कोंडावळे गावातला न्हावी हाय म्या......
पट्टा कुठ चालवायला शिकलास ?
माझ्या बानं शिकवलंय ...त्यो शहाजीराजांच्या फौजत हुता ..दंगलीत पायावर वार बसला त्येच्या ..कायमचा अधू हून घरात बसलाय ...त्येनच शिकवलंय.. हौस म्हणून..
राजांनी क्षणभर विचार केला ..येणार आमच्याबरोबर पुण्यात ?
जिवाजी हसले अन म्हणाले..तिकड येऊन काय कारायाच ?
आम्ही सांगाल तेव्हा पट्टा फिरवायचा ...आणि लिंबू ऐवजी मुडकी उडवायची गनिमांची ..करशील ?
व्हाय व्हाय राजा..मी येणार ,माझ्या बा ची लय इच्छा हाय मी शिलेदार व्हावा म्हणून ..मी नक्की येणार....
राजे हसले ..त्यानी तान्हाजीरावना हुकुम दिला...
तान्हा याच्या घरी जा...त्यांच्या घरी सगळे समजावून सांग..काय हवा नको ते बघ..घराची व्यवस्था लाव..आणि जीवाजीरावना सोबत घेऊन या......
जिवाजी महाले ..घरी जावा आणि सांगा तुमच्या वडिलांना..की मी स्वराज्याचा शिलेदार झालोय.....
अशा रीतीने राजांनी एक एक माणूस निरखून स्वराज्यात दाखल करून घेतले.. पुढे याच जीवा महालेने सय्यद बंडा सारख्या निष्णात पट्टे बाजाचा हात वरच्या वर उडवला.....अशी होती शिवबा राजांची पारखी नजर.....उगाच स्वराज्ये निर्माण होत नाहीत..
त्याला राजा असा असावा लागतो...
राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज यांचा विजय असो....

No comments:

Post a Comment