Total Pageviews

Tuesday, 19 April 2016

मिर्झाराजा जयसिंग गूढ-मृत्यू


मिर्झा राजा चा गूढ_मृत्यू

शिवरायांचे_राजकारण?

* जयपूर चा राजा,राजपुतान्याचा अधिपती, मोगलांचा सरसेनापती मिर्झाराजा जयसिंह एकाएकी मोहिमेदरम्यानच मृत्यू पावला, सर्वांचा समाज हाच कि औरंगजेबाने विषप्रयोग करून त्याला मारले.

*असे नेमके काय घडले कि औरंगजेबाने असे करावे, अनेक इतिहासकारांचे म्हणणे आहे कि मिर्झा राजाने शिवाजी राजांशी गुप्त हातमिळवणी केल्याचा औरंगजेबाचा संशय होता.याला काही कारणे होती.

* कारण १- पुरंदर तहाचे वेळी शिवरायांनी अनेकदा मिर्झाराजाला आपल्या बाजूला वळवून घेण्याचा प्रयत्न केला होता.परंतु राजांनी संपूर्ण राज्य न देता स्वतःच्या मनाप्रमाणे तह घडवून आणला.

* कारण २ - तहाप्रमाणे शिवराय आणि त्यांचे सैन्य मोगल मोहिमांसाठी लढणार होते, आदिलशाह विरुध्द मोगल+राजपूत+मराठे असे सैन्य असून सुद्धा आदिलशाही सेनापती सर्जा खान ने या मिर्झा राजा च्या फौजेला पराभूत केले.(शिवरायांचे सैन्य या युद्धात उतरलेच नाही असेही म्हंटले जाते)

* कारण ३ - आग्र्याला शिवाजी महाराजांना बोलवून नजरकैदेत ठेवण्यात आले,परंतु शिवाजी महाराज शिताफीने निसटले.येथे शिवरायांना जामीन मिर्झाराजा चा मुलगा रामसिंह होता त्यामुळे औरंगजेबाचा संशय पुन्हा बळावला.

* कारण ४- शिवराय निसटून आल्यावर तहातील कोणत्याही कलमाचे पालन झाले नाही, उलट शिवरायांनी किल्ले पुन्हा घेण्यास सुरुवात केली होती.

* सत्तेसाठी स्वतःच्या भावासकट सव्वाशे नातेवाईकांना मारणाऱ्या औरंगजेबाने मग शेवटी या आपल्या निष्ठावंत सरसेनापतीचाही २८ ऑगस्ट १६६७ ला बुऱ्हानपूर येथे कत्ल करवला.आणि स्मरणार्थ हि "राजा कि छत्री " बांधली.

* मिर्झाराजा च्या मृत्युसह स्वराज्याचा सर्वात मोठा धोका दूर झाला.

No comments:

Post a Comment