खंडेराव राजे शिर्के(डेरवणकर)
हे भवानी राजे शिर्के यांचे चिरंजीव. डभईच्या लढाईत भवानीराजे हे पराक्रमी सरदार सहभागी होते. कोकणातील डेरवण गावचे इनामदार असल्याने त्यांना डेरवणकर शिर्के म्हणतात. त्यांची मुलगी दूसरे शाहू यांना दिली होती. सातारचे प्रतापसिंह व अप्पासाहेब महाराज यांच्या त्या मातुश्री होत. खंडेराव मामासाहेब शिर्केहि म्हणत. हे फार बुद्धिमान व कर्तुत्वमान होते. साताऱ्यास नवी गादी १८१८ मध्ये निर्माण झाली. त्याप्रसंगी त्यांना ' सरलष्कर ' हे पद दिले गेले. प्रतापसिंह राजांच्या पदच्युतीनंतर त्यांचे बंधु अप्पासाहेब छत्रपती झाले. त्यांचा खंडेरावांवर विशेष लोभ होता. १८४२ मध्ये त्यांना सेनापतीपद दिले गेले. सातारचे राज्य खालसा होइपर्यन्त ते कायम होते. त्यांना क्षत्रिय मराठे जातीचे विशेष अभिमान होता. त्यांना इंग्रजांशी स्नेह होता. दक्षिणेतील संस्थानाचे संरक्षण करण्यात त्यांचा मोठाच वाटा होता. त्यांना अंबाजी आणि आनंदराव असे औरस पुत्र होते.
No comments:
Post a Comment