Total Pageviews

Sunday, 11 October 2015

पराक्रमी योध्दा सिधोजी निंबाळकर

पराक्रमी योध्दा सिधोजी निंबाळकर

महाराजांचा एक पराक्रमी सेनानी म्हणून सिधोजी निंबाळकरांची इतिहासात नोंद आहे. अदिलशाहच्या ताब्यातील पन्हाळा किल्ला जिंकल्यामुळे पिसाळलेल्या अदिलशाहने मग बहलोलखानाला महाराजांच्या चाल करावयास धाडिले.प्रचंड फौजफाटा घेऊन चाल करून येत असलेल्या बहलोलखानाचा सिधोजी निंबाळकर,सिद्दी हिलाल,विठोजी शिंदे,रूपाजी भोसले,सोमाजी मोहिते तसेच प्रतापराव गुजर या सेनानींनी गनिमी कावा करून फडशा पाडिला.

याच युध्दात सिधोजींनी बहलोलखानाच्या मदमस्त हत्तीस काबूत आणून महाराजांना भेट म्हणून पाठविला.सिधोजी महाराजांच्या आयुष्यातील शेवटच्या स्वारीस,जालन्याच्या लुटीत राजांसोबत होते.राजेंनी चार दिवस पेठा मारिल्या,शहर लुटून फन्ना केले,जडजवाहिर कापड,घोडे,उंट फस्त केले.मोगलाईचे महत्वाचे शहर मारिल्यामुळे मोघल संतप्त जाहले.मोघली फौज घेऊन रणमस्त खान चालून आला.त्याची गाठ महाराजांच्या सैन्याच्या शेवटच्या तुकडीशी संगमनेर जवळ पडली.

या युध्दात संताजी घोरपडे,सिधोजींनी मोठा पराक्रम गाजविला,पाच हजार फौजेनिशी मराठी सैन्याने रणमस्तखानास तीन दिवस झुंजविले त्यामुळे महाराजांना खजिना घेऊन सुरक्षित ठिकाणी जाता आले.पण दुदैवाने या लढाईत सिधोजींना वीरमरण आले पण त्यांचा पराक्रम इतिहासात अमर झाला.

No comments:

Post a Comment