जिंजीकोटे अर्थात जिंजी गडसमूह!
भाग १
भाग १
शिवरायांनी गौरवलेला दाक्षिणेचा अभेद्य गड म्हणजे जिंजी. भारत देशातीलच नव्हे तर परदेशातून आलेल्या शक्तींपैकी प्रत्येकांच्या ताब्यात काही काळ होता असा हा दक्षिण भारतातील एक किल्ला. वस्तुत: किल्ल्यांचे संकुल. ब्रिटिशांनी ‘ट्रॉय ऑफ इस्ट’ म्हणून नावाजले तो जिंजी किल्ला नक्कीच बघण्यासारखा आहे.
जिंजीला तामिळनाडूत चेंजी किंवा सेंजी म्हणतात. सर्वसामान्य पर्यटकांच्या भ्रमणकक्षेत सहसा न येणा-या तामिळनाडूच्या राज्यातील विलुपुरम जिलतील हा किल्ला तिरूवन्नमलै जिल्ह्याच्या मुख्य शहराच्या पूर्वेस ३६ किलोमीटरवर आहे. तिरूवन्नमलैहून चेन्नई किंवा दिंडीवनम्कडे जाणा-या सर्व बसेसचा थांबा या गडाच्या पायथ्याशी आहे, त्यासाठी बस कंडक्टरला ‘जिंजीकोटे’ असे थांब्याचे नाव सांगावे लागते. नुसते जिंजी म्हटले तर गडाच्या पुढे दोन किलोमीटरवरील जिंजी गावात आपल्याला उतरावे लागते.
जिंजीला जाण्यासाठी म्हणून आम्ही तीन मित्रांनी तिरूवन्नमलैला आदल्या रात्री येऊन मुक्काम केला होता. त्यामुळे तेथूनच सकाळी आम्ही बसमध्ये बसलो. तिरूमन्नमलैचा शहरी भाग बराच मागे पडल्यावर हायवेच्या दुतर्फा भाताची हिरवीगार, मन सुखावणारी शेते दिसत होती. शेतात गरगरीत आणि लांबट असे प्रचंड खडक दिसू लागले. जिंजी किल्ला नजीक आल्याच्या त्या खुणा आहेत, असे बसमधील एका प्रवाशाने आम्हाला सांगितले. काही अंतर गेल्यावर रस्त्याच्या आजूबाजूला तीन डोंगर दिसले. प्रथमदर्शनी नजरेस नुसत्याच मोठमोठय़ा डोंगरापासून निसटलेल्या शिळांचा ढीग दृष्टीस पडला, पण नीट पाहिल्यावर कळले की, चढणीच्या वाटेवरचे ते नुसते विखुरलेले दगड आहेत. यापैकी उत्तरेला म्हणजे हमरस्त्याच्या डाव्या हाताला दिसतो तो कृष्णगिरी (राणीचा) किल्ला. या किल्ल्यावर इंग्रज लोक राहिले होते, म्हणून याला इंग्लिश पर्वत असेही म्हणतात. थेट उजव्या हाताला दिसतो तो चंद्रगिरी ऊर्फ चांद्रायण, तर पश्चिमेला म्हणजे तिरूवन्नमलैच्या दिशेने दिसतो तो राजगिरी. राजगिरीच्या तुलनेत कृष्णगिरी उंचीने अंमळ कमी आहे.
http://itihasbynikhilaghade.blogspot.com

No comments:
Post a Comment