Total Pageviews

Friday, 11 September 2015

सरसेनापती धनाजीराव राजेज़ाधवराव

एक अपरिचीत दिनविशेष ....
सरसेनापती धनाजीराव राजेज़ाधवराव यांचा आज़ स्मृतिदिन (२७ जुन १७०८ )
पाच छत्रपतीचा सहवास लाभलेले एकमेव सरसेनापती
त्यांच्या ३०७ व्या स्मृतिदिना निमित्त
विनम्र आभिवादन
शिवकाळामध्ये धनाजी जाधव यांनी सेनापती प्रतापराव गुजर आणि सेनापती हंबीरराव मोहिते यांच्या नेतृत्वाखाली विशेष पराक्रम केला.
यामध्ये उंबरखिंडीची लढाई (१६६१), उमराणीचे युध्द (१६७२), नेसरीचे युद्ध (१६७४), कोपल बहादुरविंडा तसेच सावनूरची लढाई अशा अनेक मोहिमांमध्ये धनजीरावांनी पराक्रमाची शर्त केली आणि स्वतःची मुद्रा (शिक्का) तयार करून शिवचरणी तत्पर 'धनजी जाधव किंकर' असा बहुमान प्राप्त केला. या मुद्रेमध्ये त्यांनी स्वतःला किंकर म्हणजेच सेवक अगर चाकर असे म्हटले आहे.
छत्रपती संभाजी महाराज आणि त्यांच्यानंतरच्या प्रतिकूल काळात स्वराज्याचे रक्षण करणारे सेनापती म्हणून धनाजी जाधव यांचा उल्लेख केला जातो. त्यांच्या सेनापतीबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले जात असले तरी समकालीन संदर्भातून धनाजी जाधव यांनी अतुलनीय कामगिरी करत सेनापतीपद सांभाळले.
आज २७ जून सरसेनापती जयसिंगराव धनाजी जाधवराव यांची पुण्यतिथि
यांना मुजरा मानाचा __/\__
http://itihasbynikhilaghade.blogspot.com

No comments:

Post a Comment