मराठ्यांचे सैन्य संघटन – पायदळ
शिवछत्रपतींना पायदळाचे महत्व कळून चुकले होते. क्रमवरीनुसार मराठा सैन्यात पायदळाला दुय्यम स्थान प्राप्त झाले होते. पायदालची गतिशीलता घोडदळापेक्षा निस्चित कमी होती. परंतु शिवाजीराजांनी पायदळाकडे तेवढेच बारीक लक्ष्य दिले. महाराष्ट्रातील पर्वतमय भागात पायदळ जास्त उपयोगी पडत असे, तसेच किल्ल्यांच्या वा लष्करी ठाण्यांच्या रक्षणासाठी हजारो पायदळ सैनिकांची गरज भासत असे. पायदल सैनिकांची भरती मुख्यत: मावळे आणि हेटकरी आणि इतरही काही लोकांमधून करण्यात येत असे. स्वता शिवाजीराजांतर्फे सैन्यभरती होत असे. प्रत्येक किल्ल्यात पायदाळच्या तुकड्या सज्ज असत. सर्वात लहान तुकडी 10 सैनिकांची असे.
पायदळाची रचना अशी होती :-
१० सैनिकांवर – १ नाईक
५ नाईकांवर – १ हवालदार
३ हवालदारांवर – १ जुमलेदार
१० जुमलेदरांवर – १ हजारी
७ हजारिंवर – सेनापती (सरनौबत)
महाराजांच्या सैन्याच्या पायदळत सुमारे १०५०० सैनिक होते.
पायदळतील जुमलेदारास १० होन प्रतिवार्षी मिळत तर सबनिसास ४० होन मिळत असत. हजारीस ५०० होन प्राप्ती होत असे.
पायदालचे मुख्य कार्य पर्वतीय आणि दुर्गम भागातील शत्रूशि लढण्याचे असे. सोबत त्यांना घोडेस्वरांचे सुध्हा रक्षण करावे लागत असे. पायदळात ठिकठीकाणहून गोळा केलेले अनेक नवशिके लोक होते. त्यांना युध्हाचे शिक्षण देण्याकरिता त्यांना उघड्या शेतात तीन महिने तळ ठोकावा लगे, वेल पडल्यास घोडेस्वारी, युद्धकलेचे सर्व डाव कसे खेळावेत आणि लढाई कशी करावी या विषयी चे शिक्षण त्यांना काळजी पूर्वक दिले जात असे.
No comments:
Post a Comment