Total Pageviews

Thursday, 10 September 2015

सरलष्करं सेनापती "मह्लोजी घोरपडे भाग १.२

सरलष्करं सेनापती "मह्लोजी घोरपडे
भाग १.२
मुकर्रब खानानं आपले पेरून ठेवले होते फितूरं तिथचं. आणि "संगमेश्वरला" शंभर भालायतांसोबत संभाजी राजे "संगमेश्वरंच्या" वाटेनं निघाले...निघाले आणि एवढीच बातमी मुकर्रब खानाच्या कानावर पोहोचवण्यात आली..."संभाजी राजे संगमेश्वरला सरदेसायांच्या वाड्यात मुक्कामाला थांबले"...मुकर्रबला पक्की बातमी, अवघ्या शंभर भालायतांसोबत राजे संगमेश्वरला सरदेसायांच्या वाड्यात आहेत. "नामी संधी आहे लगोलग निघा" आणि मुकर्रब खान पाच हजारांच सैन्यं घेऊन टाकोटाक निघाला, पन्हाळ्याला बगल देत निघाला संगमेश्वरच्या दिशेनं.
पन्हाळा अंधारात गुडूप झालेला. पहारेकरी पहारा देत होता. अचानक कायतरी दिसलं आणि चबकला..बेंबीच्या देठापासनं कडाडला..."मालोजी बाबा,,,काळोखं उजळंत तलुता चाल्याती" आणि मालोजीच्या काळजाचा ठोका चुकला..."कुण्या रोखानं?"......"जी संगमेश्वराच्या"......आरं!..राजं हायत...आरं! राजं हायत...कुणी गनिमानं डाव साधला, अरे! निघा..निघा शिबंदी उठवा...राजांची जान वाचवायला पायजे...आरं! निघा...!!!
आणि बघता बघता मावळा सज्ज झाला. मुकर्रब खानाच्या पाच हजार फौजेला बगल देत "मह्लोजी बाबा" पाचशे मावळ्यासैत दौवडू लागला...दौवडू लागला आपल्या राजासाठी, राज्याच्या रक्षणासाठी निघाला...निघाला आला संगमेश्वरामध्ये वेस ओलांडून धपापत्या उरानं..."राजं..!,,,राजं..!,,,राजं..! निघा..निघा राजं..! नावडी जवळं करा"...संभाजी खाली आले "का?..का? मालोजी...काय गडबडं?...कोण आफत?"......"राजं.! आफत लयं मोठी राजं.!,,,राजं.! निघा नावडी जवळं करा...गनिमानी गावं येरबाडलयं राजं.!,,,,,,राजं.! निघा...!!!
संभाजी राजे म्हणाले, "नाही मालोजी तुमच्या थकल्या खांद्यावर "स्वराज्यं" सोपवून जायला "राजे" नाही झालो आम्ही...मरू इथंच, झुंजू इथंच पण! रण टाकून पळणारं नाही"
..."नाही राजं.!,,,लाखं मेलं तरी चालतील पण! लाखांचा पोशिंदा वाचला पाहिजे...राजं!..निघा,,,नावडी जवळं करा राजं.......!"
पण! त्याचं वेळी मुकर्रबची फौज संगमेश्वरच्या वेशीला भिडलेली. पाचशे मावळा आमचा डोळ्यांत डोळा घालून बघत होता. बस्सं!!! अफाट...अफाट सेनासागरं आणि टिचंभर पाचशे मावळा राजाच्या रक्षणासाठी सिद्ध आहे.
http:itihasbynikhilaghade.blogspot.com

No comments:

Post a Comment