Total Pageviews

Thursday, 10 September 2015

स्वराज्यातील पहिले धरण

*** स्वराज्यातील पहिले धरण ***
छत्रपती शिवरायांनी इसवी सन १६५६ साली खेडशिवापूर येथून वाहणाऱ्या आंबील ओढ्यावर स्वराज्यातील पहिले धरण बांधून प्रजेच्या पिण्याचे व शेतीच्या पाण्याची सोय केली.. या धरणाचे वैशिष्ट्य म्हणजे धरणाच्या दोन्ही बाजूनी पाणी गावात खेळते राहण्यासाठी २ पाट काढले त्यातील उजव्या बाजूचे पाणी खोलेश्वर मंदिरा जवळून खेड शिवापूर येथील शिवाजी महाराजांच्या वाड्याजवळून तसेच पुढे भाऊ नागोजी वाड्याच्या पाठीमागुन जाते व तसेच पुढे केतकाई येथे आंबील ओढ्यास जाउन मिळते.. व डाव्या बाजूच्या पाटाचे पाणी शेतीसाठी पटी या विभागातून पुढे जाऊन खेड शिवापूर चे श्रद्धास्थान असलेल्या आई भवानी मातेच्या हेमाडपंती मंदीरा जवळून जाउन पुन्हा आंबील ओढ्यास मिळते. येथे असलेल्या साळोबा मंदिरा मुळे या धरणास साळोबा चे धरण म्हणतात..
२००५ - २००७ च्या दरम्यान शिवापूर गावावर असलेल्या दुष्काळाच्या दरम्यान गावकऱ्यांना या साळोबाच्या धरणानेच पाणी पुरवले, पाण्याची वानवा संपल्यावर त्यातील एक पाट बंद करण्यात आला, पण आजही शिवापूर गावच्या शेतीसाठी लागणारे हे पाणी साळोबाचे धरण पुरवते......
आम्ही कितीही प्रगत झालो, कंबरेचे काढून डोक्याला गुंडाळून मिरवले तरी आम्हाला शिवकाळाशिवाय आजही पर्याय नाहीच......
३५० वर्षांपूर्वी उभारलेल्या जालप्रणालीने २१ व्या शतकातील शिवार पिकतात अन नरडी गार देखील व्हतात
राजा................... जाणता राजा...................................
आलतू फालतू पोस्ट आवर्जून जश्या शेअर मारल्या जातात तशीच हे पोस्ट देखील आवर्जून शेअर करा कळूद्यात अख्ख्या दुनियेला आमचा राजा किती प्रजाहितदक्ष होता.
http://itihasbynikhilaghade. blogspot.com

No comments:

Post a Comment