Total Pageviews

Tuesday, 1 September 2015

शिवकालातील १२ महाल व १८ कारखान्यांची यादी

शिवकालातील १२ महाल व १८ कारखान्यांची यादी
१२ महाल
महाल या शब्दाचा अर्थ या क्षेत्रात जागा, ठिकाण किंवा व्यवस्थापन इमारत असा अभिप्रेत आहे.
१. दारुणी महाल – अंतर्भाग / खाजगीतील जागा, छत्रपती, सरंजामी सरदार व पेशवे आदी प्रस्थांची खाजगी इमारत
२. खजिना महाल – द्रव्य भांडार, तिजोरी असणारी इमारत
३. अंबार महाल – धान्यागार
४. पागा – घोडे बांधण्याचे तबेले व अश्वशालेचे व्यवस्थापन पाहणारे इमारत वजा बांधकाम
५. गौशाला – गाई म्हशींचे गोठे , दुध दुभत्याची साठवण व निगराणी राखण्याकरिता असलेली इमारत
६. बाग महाल – सरकारी बागांची देखभाल करणारे बागमाळी यांची कार्यालयीन इमारत
७. टांकसाळ – चलनी नाणी करण्याचा कारखाना असलेली इमारत
८. शिबंदी – फौज व वसुली कामाकरिता ठेवलेल्या शिपायांची बडदास्त ठेवण्याकरिता असलेली इमारत
९. इमारत महाल – सरकारी इमारतींचे बांधकाम व्यवस्था पाहणाऱ्या खात्याची इमारत
१०. सौदागिरी महाल – व्यापार वृद्धी व आयात निर्यात हेतू प्रीत्यर्थ उभारलेली इमारत
११. चौबिक महाल – लाकडाचा साठा व सांभाळ करण्यासाठी उभारलेली इमारत
१२. जामदार महाल – वस्त्रालंकार ठेवण्यास खास इमारत
१८ कारखाने
कारखाना हा शब्द फारसी असून याचा अर्थ विविधांगी उद्योगशाला असा आहे.
राज्यव्यवहारकोशाद्वारे शिवाजी महाराजांनी फारसी नावास पर्यायी संस्कृत प्रतिशब्द देवून नवी नावे देण्याची खटपट केली खरी परंतु पुढे पुन्हा जुनीच नावे वापरत असलेली अधिक आढळतात.
१. पीलखाना – गजशाला
२. अंदारखाना / आब्दारखाना – जलशाला / पानीयशाला
३. उष्ट्रखाना – उंटशाला
४. जवाहीरखाना – रत्नशाला
५. गाडीखाना – रथशाला
६. फरासखाना – शिबीरशाला
७. तालीमखाना – मल्लशाला
८. जिन्नसखाना – वस्तुशाला
९. अंबारखाना – धान्यशाला
१०. तोफखाना – यंत्रशाला
११. शिकारखाना – खाटकशाला
१२. दप्तरखाना – लेखनशाला
१३. मुद्पाकखाना / मुद्बखखाना – पाकशाला
१४. नटखाना – नाटकशाला
१५. नगारखाना – दुंदुभीशाला
१६. सराफखाना – अलंकारशाला
१७. सरबतखाना – वैद्यशाला
१८. लकडखाना / गन्जीखाना  – काष्ठशाला / बर्धकीशाला
संदर्भ –शिवकालीन महाराष्ट्र – अ रा कुलकर्णीराज्यव्यवहारकोश – अ द मराठेस्वराज्याचे छत्रपती आणि अष्टप्रधान – अविनाश सोवनी.
http://itihasbynikhilaghade.blogspot.com

No comments:

Post a Comment